सुनसगाव येथे तरुण शेतकर्‍याची आत्महत्त्या

0
सुनसगाव ता.भुसावळ | वार्ताहर :  येथील रहीवाशी व शेतकरी कुटुंबातील तरुणाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील वार्ड क्र ३ मधील रहिवाशी किशोर उर्फ नितीन विठ्ठल काटे (धनगर) (वय ३२)याने दि. ९ जुलै १७ रोजी सकाळी १० वाजता आपल्या राहत्या घराजवळ शेतात फवारणीसाठी आणलेले औषध सेवन केले. त्याला तात्काळ जळगावच्या जिल्हा रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु करण्यात आले.

उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांना देण्यात आले.आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

मयत किशोर हा शेती व्यवसाय करुन कुटुंबाला मदत करीत होता.त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, २ मुली, भाऊ, वहिणी असा परिवार आहे.

याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारीयांच्या खबरीवरुन जिल्हापेठ (जळगाव) पो.स्टे.ला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. असून तपास भुसावळ तालुका पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

*