Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

… तर पाकस्थित अतिरेकी संघटनांवर कारवाई करू : इराणची धमकी

Share
नवी दिल्ली : दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानचेही इराण सरकार आणि तेथील लष्करानं कान उपटले आहेत.
 पाकिस्तानस्थित ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे अड्डे भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केल्यानंतर आता इराणनंही दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईची धमकी देत थेट ‘युद्ध’ पुकारलं आहे.

इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) कोड्स फोर्सचे जनरल कासीम सोलेमनी यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात येईल, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

याशिवाय दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेले पाकिस्तानचं सरकार आणि लष्करालाही जाब विचारला आहे. ‘तुम्ही कोणत्या दिशेला चालला आहात?’ सीमेवर आणि शेजारी देशांमधील अशांततेला तुम्हीच कारणीभूत आहात’, असा थेट आरोपच जनरल कासीम यांनी केला आहे.

तुमच्याकडे अणुबॉम्ब आहे. तरीही तुमच्या देशात कार्यरत दहशतवादी संघटनांचा तुम्ही नायनाट करू शकला नाहीत, असा सवाल करत पाकिस्ताननं इराणच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!