Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

# Video # किनगाव परिसरात रस्त्यावरील कोरड्या झाडांना लावली जातेय आग

Share

यावल । प्रतिनिधी :  रस्त्यावरील किनगाव गावाजवळील छोटू आबांच्या ढाब्याजवळ अर्धा किलोमीटर अंतरावरील मोठ्या कोरड्या झाडाला आग लावून दिल्याची घटना घडली .

या कालखंडात दरवर्षी बर्‍हाणपूर अंकलेश्वर रस्ता व यावल ते भुसावळ रस्ता या रस्त्यावर अशी झाडे जाळण्यात येतात. सार्वजनिक सुटीच्या दिवशी व शनिवार रविवार पाहून या झाडांना मध्यरात्री आग लावली जाते. अर्धवट जळत असलेल्या झाडांवर पाणी टाकून आग विझवत ते झाड इलेक्ट्रॉनिक करवतीने अवघ्या अर्ध्या तासात कापून नेले जाते.

हा सारा प्रकार वर्दळीच्या रस्त्यावर हो असतांना काही नागरीक विचारणा करतात. तेव्हा त्यांना जळालेले झाड तोडले असून शासकीय काम असल्याचे सांगून पिटाळले जाते.

यावल तालुक्यातील पोलीस प्रशासन बर्‍याच वेळा अवैध वाहतुक करणार्‍या रेतीच्या ट्रॅक्टरांची विचारणा करते. मग अशा झाड तोडणार्‍या व कापून नेणार्‍याची विचारणा का करत नाही? वनविभाग तर यावल तालुक्यात आता असुन नसुन सारखा झाला आहे. लोकप्रतिनिधीही डोळे असून आंधळ्याचेे रूप घेत आहेत.

फक्त शासनाच्या योजना आल्या तर त्याचा गाजावाजा करून फोटो काढून आपल्या बातम्या प्रसिद्ध करतात. मात्र वनसंपत्तीचा र्‍हास होतो आहे व त्यावर दरोडे टाकले जात आहे याकडे मात्र सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष आहे. याकडे तालुक्यातील यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी जागृत राहणे गरजेचे असून अश्या वृक्षांचे संवर्धन व होत असलेली तूट थांबवणे गरजेचे आहे अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!