Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्याला नोबेल द्या : इम्रान खान

Share
नवी दिल्ली :  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, या मागणीनं पाकिस्तानात जोर धरला असतानाच, मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा, असे मत  इम्रान खान  यांनी   व्यक्त केले आहे.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशात पाठवल्यानंतर इम्रान खान यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी पाकिस्तानात जोर धरू लागली आहे. त्यावर इम्रान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
यासंबंधी त्यांनी सोमवारी ट्विट केलं आहे. नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा. या मुद्द्यावर तोडगा निघाल्यास या क्षेत्रात शांतता नांदेल आणि विकास होईल, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!