अजिंठा घाटात अपघात : ९ तास ट्राफिक जाम

0
वाकोद ता. जामनेर (वार्ताहर): जळगाव औरंगाबाद महामार्ग क्र.१८६  असलेल्या अजिंठा घाटात शनिवार सकाळी पाच वाजेच्या दरम्यान घाटाच्या मधोमध दोन मालवाहतुक ट्रकां मध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने अपघात झाला
 घाटाच्या माधोमध ट्रक क्र. एम. एच. २८ बी. ८०५५ व ट्रक क्र. जी. जे. १९ यू. ३४५२ या दोन्ही ट्रकांचा समोरसमोर अपघात होवून दोघां वाहनाच्या कॅबीनचे नुकसान झाले आहे तर ट्रक चालक जखमी झाले आहे
या अपघाता मुळे  वाहतुकीची मोठी कोंडी झाली पाहता पाहता ही वाहतूक सुमारे वाकोद कडून धनवाट फाट्या पासून तर अजिंठा कडून मड फाट्या पर्यंत सुमारे १५ किमी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली होती ही वाहतूक सुरळीत करतांना अजिंठा व फर्दापुर पोलिसासह वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक उडाली होती
तर या ट्राफिक मुळे हजारो वाहनांची रेलचेल थांबून होती तसेच शेकडो परिवहन मंडळाच्या बसेस मुळे प्रवाश्याचे प्रचंड हाल झाले.
उन्हाची दाहकता सोसवेना
 अजिंठा घाटात तासंतास अडकून पडलेले वाहन धारक आणि बस मधील प्रवाशी तसेच खाजगी वाहनामधील प्रवासी पाहता उंच टेकडी वर असलेल्या घाटा मध्ये दुपारच्या प्रहरी कडकडत्या उन्हाच्या तीव्रतेच्या दाहकतने प्रचंड हाल झाले रस्त्यात वाहनच्या बाहेर पडून झाडाच्या सावलीचा तर कोणी बाहेरच्या हवेचा आधार घेताना दिसत होते तर लहान बाल गोपाल प्रचंड उन्हाने होरपळत होते.
सदर अपघाताची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात केली असून अपघात ठिकाणी क्रेन च्या साह्याने दोघी वाहनांना रसत्याच्या बाजूला केल्या नंतर थोडी थोडी वाहतूक सुरळीत करण्यात आली दुपारी २ वाजे पर्यंत वाहतूक सावरण्याचे काम सुरु होते .
पिकअप साठी दुचाकींची मोठी वर्दळ
अजिंठा ते फर्दापुर पर्यत संपूर्ण घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती वाहने बराच वेळ थांबुन असल्याने जवळ पासच्या नाते वाईक मित्र कंपनी ला या वर्दळी तुन निघण्यासाठी बोलविले जात होते या प्रचंड ट्राफिक मध्ये दुचाकी शिवाय कोणताच पर्याय नसल्याने मोठ्या प्रमाणावर मोटर सायकलींची मोठी गर्दी वर्दळी जाणवत होती तर बस मधून खाजगी वाहना मधून प्रवाश्यानां घेवून जातानांचे चित्र दिसत होते.
होटेलीनां आले यात्रेचे स्वरूप
 वाकोद पासून ते फर्दापुर पर्यत होटेल आणि ढाब्याची संख्या मोठी असून येथील प्रत्येक होटेल परिसरात वाहनांची मोठी झुंबड पडलेली होती प्रत्येक होटेल परिसरात असंख्य वाहने थांबुन होती या मुळे येथे प्रवाश्याना प्रचंड वेळ घालावा लागला
 विदेशी पर्यटकांना ही फटका
 येथे जग प्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच या औरंगाबाद ऐतिहासिक जिल्हा असल्याने येथे दररोज देशी विदेशी पर्यटकांची ये जा असते या वाहतूक कोंडी चा फटका देखील विदेशी पर्यटकांना बसला त्यांना देखील तासन तास या ठिकाणी उन्हाच्या दाहकतेत घालावा लागला

LEAVE A REPLY

*