आईची कडवी झुंज ठरली अपयशी !

0
चाळीसगाव/उंबरखेड । दि.8 । प्रतिनिधी-तालुक्यातील उंबरखेड येथे शेतात आई सोबत गवत कापण्यासाठी गेलेल्या 8 वर्षीय बालकांवर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाला.
आईने बिबट्याच्या जबड्यातून मुलाला सोडविण्यासाठी कडवी झुंज दिली. परंतू बिबट्यानी मुलाच्या मानीत दात गाढल्याने मुलांचा जागेवर मृत झाला.
शेतातील इतर मजुरानी बिबट्यावर दगडाचा मारा केल्यानतंर बिबट्याने मृत बालका सोडुन पळ काढला. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या पूर्वी घडली.

काठेवाडी समाजाचे नथू काठेवाडी हे सर्व कुटूबांसह उंबरखेड गावाबाहेर गेल्या 40 वर्षांपासून वास्तवास आहे. त्यांचा नातू राहुल कालू चव्हाण हा दि.9 रोजी आई लक्ष्मीबाई सोबत उंबरखेड शिवारातील दिलीप पाटील यांच्या शेतात गवत काढण्यासाठी गेला होता.

सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान आई शेतातील गवत कापत होती. तर राहुल आईच्या पाठीमागे बाजूलाच खेळत होतो. अचानक दबा धरुण बसलेल्या बिबट्यांनी राहुलवर अनापेक्षितपणे हल्ला केला, आणि त्यांची मान पकडली.

बिबट्याने मान पकडता राहुलाने आरडा-ओरड केली. बिटट्या राहुल घेऊन जात असतानाच, राहुलचा अवाज ऐकूण आईने मागे वळुण पाहीले असता, राहुल थेट बिबट्यांच्या जबड्यात पाहुन, तिच्या पाया खालची जमीनच सरकली, परंतू आशाही परिस्थिती तिने बिबट्यांच्या तावडीतून राहुला सोडविण्यासाठी त्याला पकडले, शेवटच्या क्षणापर्यंत बिबट्यांच्या तावडीतून मुलाला सोडविण्यासठी आतोनात प्रयत्न केले.

जवळच शेतात काम करत असलेल्या मजुरांनी हे दुश्य पाहताच, आई-मुलाच्या मदतीला ते धाऊन आले. आणि बिबट्यावर दगडाचा मारा केला.

अचानक दगडाचा मारा झाल्यामुळे बिबट्याने बालकाला सोडुन पळ काढला. परंतू तोपर्यंत खूप उशिर झाला होता.

मुलाच्या मानेत बिबट्याने खोलवर दात गाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही खंबर गावात कळताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबटया पसार झाला होता.

घटनास्थळी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ऐपीआय दिलीप शिरसाठ व वनविभागाच्या कर्मचर्‍यांनी भेट दिली असून पंचनामा केला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आई कडवी झुंज अखेर अपयशी-
आई लक्षीबाई चव्हाण(काठेवाडी) शेतात गवत काढत असताना, सोबत गेलेल्या आठ वर्षीय राहुल आईच्या मागेच खेळत होता. अचानक बिबट्याने हल्ला केल्याने, राहुलच्या ओरड्यांना आवाज ऐकू आल्याने आई मागे पाहिले असता, बिबट्याच्या जबड्यात राहुल दिसला.

तशाही परिस्थित तीने न डगमगता आपल्या पोट्याच्या गोळ्या वाचविण्यासाठी राहुलला बिबट्याच्या जबट्यातून ओढण्यांचा प्रयत्न केला.

बिबट्या ऐकीकडे आपली शिकार ओढत होतो. तर दुसर्‍या बाजूने आपल्या पोटाच्या गोळ्याला वाचविण्यासाठी आई त्याला ओढत होती. परंतू बिबट्याने बालकाच्या मानेत खोलवर दात गाढलेले होता.

त्यामुळे आईचे प्रयत्न अपूर्ण पडत होते. शेवटी जवळ शेतात काम करीत असलेले मजुरांनी बिबटयावर दगडा मारा केल्यानतंर बिबट्याने बालका सोडुन पळ काढला, परंतू तोपर्यंत खूप उशिर झाला होता.

आईच्या हातात बालकाचा मृतदेहच बिबट्याने सोडुन पळ काढला. यामुळे तेथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. आईने दिलेली झुंज अपयशी ठरली, परंतू आईने गंभीर परिस्थितीत बिबट्यांचा केलेला सामना हा खरच इतर मातासाठी प्रेरणादायी आहे. शनिवारी बालकाच्या दुदैवी मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

 

LEAVE A REPLY

*