रनर्स गु्रप व रोटरी क्लब ऑफ वेस्ट यांच्यातर्फे आंतराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांचे उद्या व्याख्यान

0
जळगाव |  प्रतिनिधी  : आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी धावणे गरजेचे आहे. महिलांना धावण्यासाठी प्रेरणा मिळावी याकरीता आंतराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी दौड जिंदगी के लिये या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. तृप्ती बढे, डॉ. सिमा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रनर्स गु्रप व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने आंतराष्ट्रीय धावपटू यांच्या व्याख्यानाचे आयोजन रोटरी हॉल येथे करण्यात आले आहे. धावपटू क्रांती साळवी या ४९ वर्षांच्या आहे. त्यांनी शालेय जिवनातच ऍथलॅटीक्स मध्ये सहभागी होवून राष्ट्रीय ऍथलॅटीक्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले.

त्यानंतर सुमारे वीस वर्षाच्या कालांतरणाने त्यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी आपल्या मुलासोबत धावण्यास सुरुवात केली. तसेच बॉस्टर्न येथे एप्रिल महिन्यात होणार्‍या आंतराष्ट्रीय मॅरथॉन स्पर्धेत त्या सहभागी होणार आहे.

आजच्या धावपळीच्या जिवनात अभियंत्याची नोकरी, परिवार सांभाळून त्या आंतराष्ट्रीय ऍथेलॅटिक्स आहे. जळगावातील महिला सुदृढ आरोग्यापासून वंचित आहे. या महिलांना धावणे आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे याविषयी माहिती मिळावी यासाठी क्रांती साळवी यांच्या दौड जिंदगी के लिये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

तरी महिलांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत डॉ. रवी हिराणी, वैदांती बच्छाव, प्रेमलता प्रकाशसिंग, डॉ. तृप्ती बढे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. सिमरन कौर जुनेजा, रोटरी वेस्टचे अध्यक्ष सुरज जहॉंगीर, ज्ञानेश्वर बढे, किरण बच्छाव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*