जळगावच्या तरुणाची इचलकरंजीत हत्या

0

जळगाव / शालकाच्या लग्नपत्रीका वाटपासाठी गेलेल्या तरुणाची इचलकरंजीमध्ये हत्या झाली.

ही घटना शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. हत्येबाबत कळताच जळगावातील तांबापुरामध्ये नातेवाईकांनी टाहो फोडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगावातील तांबापुरामधील कजंरवाडामध्ये बबलु सुभाष नवले (वय 25) राहतात.

बबलु याचे शालक विशाल विनायक नेतले (रा. संजयगांधीनगर जोशी कॉलनी, कंजरवाडा) यांचा विवाह सोहळा दि.8 मे रोजी आहे .

त्यानिमीत्त बबलु हे लक्ष्मीबाई मलके यांच्यासोबत कोल्हापुर, इचलकरंजी, पूणे, बारामती परिसरात लग्नपत्रिका वाटपासाठी गेले होते.

नवरदेव विशालचे काका सावंत नेतले हे इचलकरंजीला राहतात. सावंत यांच्या मुलगा रोहन सावंत नेतले यांच्यासोबत बबलु हे दुचाकीने पत्रीका वाटपासाठी निघाले.

दरम्यान शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रोहन नेतले याच्या एकाशी पूर्ववैमनस्यातुन वाद झाला.

या वादातुन रोहन व कृणाल सावंत याच्याशी शाब्दीक वाद झाला. दोघांचा वाद सोडविण्यासाठी बबलु गेला असता त्याच्याशीही बाचाबाची कृणालने केली.

लोखंडी रॉडने मारहाण
कृणाल याने वाद झाल्याची त्याच्या मित्रांना फोन केला. यावरुन इचलकरंजी येथील बकनौर चौकात कृणाल व त्याचा मामा याच्यासह चार ते पाच तरुण आले.

कृणालसह संशयीतांनी लोखंडी रॉडने बबलु याला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेही रोहन नेतले याने घटनास्थळून पळ काढला.

उपचारादरम्यान बबलुचा मृत्यू
बकनौर चौकात झालेल्या झटापटीमध्ये एक युवक जखमी अवस्थेत पडल्याचे पाहुन नागरीकांसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी त्याला सीटी हॉस्पीटल येथे दाखल केले. याठिकाणी आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास बबलु याचा मृत्यू झाला.

रुग्णालयात नातेवाईकांचा दांगडो
सीटी हॉस्पीटलमध्ये बबलु यांची ओळख पटविण्यासाठी कंजरभाट सामाजाचे सामाजिक कार्यकर्त्य जयराज भाट यांनी जळगाव फोन केला.

त्यावरुन नरेश बागडे यांनी राहुल नेतलेकर, सचिन बाटुंगे, विजय अभांगे यांच्याशी संबधीत इसमाबाबत माहिती दिली.

त्यावरुन त्याच्या नातेवाईकांनी बबलु याची ओळख पटली. दरम्यान आरोपीला अटक करण्यासाठी इचलकरंजी येथील नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला होता.

कंजरवाड्यात आक्रोश
बबलु याच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नी नुतन यांच्यासह नातेवाईकांनी मन हेलाविणारा आक्रोश केला.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा
शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रोहन सावंत यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 307 प्रमाणे कृणाल सावंत त्याचा मामा व सोबत चार ते पाच जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास डीवायएसपी व्ही.एस.नराडे करीत आहेत. दरम्यान खूनाचे अतिरीक्त कलम लावण्यात येणार असल्याचे शिवाजीनगर पोलीसांनी दै.देशदूतशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*