सावदा रेल्वे स्थानकावर बसरेड : ४९२ केसेसमधून २ लाख १२ हजार रुपये दंड वसूल

0

भुसावळ | प्रतिनिधी  : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात वरिष्ट वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनात सावदा रेल्वे स्थानकवार  बसरेड करण्यात आली. त्यातुन २ लाख १२ हजार १८५ रुपये दंड वसुल करण्यात आला.

याबसरेड मध्ये विभागीय मुख्य तिकिट निरीक्षक अजय कुमार, मुख्य तिकिट निरीक्षक एच.एस.अहालुवालिया, एन.पी.पवार यांच्या मार्गदर्शनता ४० तिकिट तपासनिस , १९ आरपीएफ, ३ लोहमार्ग पोलीस कर्मचारी हा चमु सकाळी ६ वाजेला भुसावळ स्थानकातुन बसने सावदा रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला.

सव्वा दोन लाखांचा दंड

त्यात विना तिकिट २३४ प्रवाशांकडुन ९२ हजार २२५ रुपये दंड वसुल करण्यात आला. अनियमित २४१ प्रवाशांकडुन १ लाख १४ हजार २३० रुपये, विनानोंदणी साहित्य नेणार्या २ प्रवाशांकडुन २०० रुपये , रेल्वेत घाण पसरविणार्या १५ प्रवाशांकडुन १५०० रुपये, अशा ४९२ प्रवाशांकडून २ लाख १२ हजार १८५ रुपये दंड वसुल करण्यात आला.तसेच अनाधिकृत ९ फेरी विक्रेत्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.

या गाड्यांची केली तपासणी

गाडी क्र. ११०५७ दादर-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस, ११०९३ महानगरी एक्सप्रेस, १२१६७ वाराणसी एक्सप्रेस, ५११८७ भुसावळ -कटनी पॅसेंजर,१५०१८/१५०१७ काशी एक्सप्रेस, ११०७२ कामायनी एक्सप्रेस, १२१६५ रत्नागिरी एक्सप्रेस, ११०६० छपरा एक्सप्रेस, ५११५८ इटारसी -भुसावळ पॅसेंजर, २२९४८ भागलपुर-सुरत एक्सप्रेस,१५६४६ गोव्हाटी एक्सप्रेस, १२५३३ पुष्पक एक्सप्रेस, १२६२८ कर्नाटक एक्सप्रेस, ११०६८ साकेत एक्सप्रेस यागाड्यामधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*