भारतीय सिंधू सभेची आजपासून राष्ट्रीय सभा

0
जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय प्रतिनिधी सभा उद्या दि.8 व 9 रोजी जैन व्हॅली येथील गांधी तीर्थ येथे होणार आहे.
या सभेसाठी देशभरातून 200 प्रतिनिधी सहभागी होणार आहे. तसेच सिंधी समाजाचे विविध राज्यातील विद्यमान 9 आमदारांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारीणीचे अध्यक्ष लधाराम नागराणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधी समाज व्यवसाय व व्यापारनिमित्त देशभरात विखुरला असून समाजाला मोठी संस्कृती लाभलेली आहे. तसेच समाजाला गौरवशाली इतिहास लाभला असून समाजात चेतना जागविणे, मातृभाषेविषयी नवीन पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी वर्षातून चार वेळेस या बैठकीचे आयोजन करण्यात येत असते.

त्या अनुषंगाने यावेळी भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय प्रतिनिधी सभा जळगावात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समाजातील विविध समस्यांवर चर्चा होणार आहे.

पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदास चंदिरामानी, महामंत्री राधाकृषण भागीया, भगतराम छाबडीया, महेश तेजवाणी, डॉ. उदासी, माजी आ. गुरुमुख जगवाणी, प्रितमदास रावलानी, संजय हिराणी, राजेश मलिक आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*