चाळीसगाव शहरातील भारनियमना विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

0
 चाळीसगाव | प्रतिनिधी : शहरात ऐन उन्हाळ्यात होणार्‍या भारनियमन मुळे नागरिक त्रस्त
विरोधात झाले आहेत.

सततच्या होणार्‍या भारनियमा विरोधात शुक्रवार राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत थेट महावितरणच्या कार्यालवार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धडक दिली.

महावितरणच्या अधिकार्‍यांच्या भारनियमनांचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यासाठी अलटिमेट दिला असून त्यासंबधीचे निवेदनही देण्यात आले आहे.

भर उन्हाळ्यात शहरातील १३२ केव्ही (११ केव्ही डेअरी परिसर), ३३/११ केव्ही सी.टी.एम. (११ केव्ही घाट रोड, हुडको परिसर), १३२ केव्ही चाळीसगाव (११ केव्ही शहर आणि सी.टी.एम), आणि ३३/११ केव्ही एम.आय.डी.सी (११ केव्ही जुने विमानतळ परिसर) या भागात दररोज भारनियमनमाच्या नावाखाली ५ ते ६ तास विज जात आहे.

त्यामुळे नागरिकांचे आणि व्यापारी बांधवाचे हाल होत असून त्या संदर्भात महाविरतरण कुठल्याही प्रकारीची पुर्वकल्पना दिली गेली नाही. भारनियमनच्या नावाखाली वीज वितरण महामंडळाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरले जात आहे.

सद्या महाविद्यालयीन परिक्षा चालु असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

वीज ग्राहकांना वीजेसंबंधी प्रश्‍न दररोज भेडसावत आहेत. त्यातच पुढील महीन्यात येणारा रमजान महीना पाहता भारनियमनच्या नावाखाली महावितरणकडून वीज ग्राहकांना वेठीस धरण्यात येत.

शुक्रवारी नगरसेवक रामचंद्र जाधव, सुर्यकांत ठाकूर, जगदीश चौधरी, दिपक पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील लक्ष्मीनगरस्थित राष्ट्रवादीच्या कार्यालयावर धडक दिली.

भारनियमनबाबत नागरिकांच्या समस्यांची कैफीयत वितरण मंडळाचे उप कार्यकारी अभियंता एस.बी.जोशी यांच्या सामोर माडली.

यावेळी अभियंता जोशी यांनी माझा हातात कुठल्याही निर्णय घेण्यंाचा आधिकार नसून मी तुमच्या मागण्या वरिष्ठा पर्यंत पोहचतो करतो असे सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नगरसेवकांना सांगीतले.

यावेळी राष्ट्रवाचीचे शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, सुर्यकांत ठाकुर, दिपक पाटील, फकीरा बेग, पं.स सदस्य अजय पाटील, सदाशिव गवळी किशोर पाटील, बाजीराव दौंड, छगन पाटील, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, किशोर पाटील, गौतम जाधव, बाजीराव दौंड, युवक उपाध्यक्ष निरज अजबे, विद्यार्थी शहराध्यक्ष शिवसागर पाटील, लक्ष्मीकांत चौधरी, प्रकाश पाटील, ऋषीकेश देशमुख, चंद्रराज पाटील, अजय पाटील, हृदय देशमुख, शुभम पवार, एजाज शेख, स्वप्नील कोतकर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*