एक्सप्रेसमध्ये विनयभंग करणार्‍या बांग्लादेशी तरुणास अटक

0
 भुसावळ – : मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या ३० वर्षिय युवतीचा विनयभंग करणार्‍या २९ वर्षिय बांगलादेशीत तरुणाने विनयभंग केल्याची घटना दि. ७ जुलै रोजी पहाटे १ वाजता नागपूर-भुसावळ दरम्यान घडली. याबाबत लोहमार्ग पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
 लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पिडीत युवती हावडा -मुंबई दुरांतो एक्सप्रेसने नागपूर ते मुंबई असा प्रवास करत असतांना याच गाडीतून बांगलादेशी आरोपी मो.आयुब मो. सुलेमान (२३, रा. रतनपूर वार्ड क्र ९ फेनी सदर, जि. फेनी. बांगलादेश) हा प्रवास करत होता.
दरम्यान नागपूर ते भुसावळ पर्यंतच्या रेल्वे प्रवासात युवती झोपेत असतांना आरोपीने युवतीचा विनयभंग केल्याची घटना दि. ७ जुलै रोजी पहाटे १ वाजता घडली.
 याबाबत पीडित युवतीने गाडी सीएसटी मुंबई स्थानकावर पोहचताच लोहमार्ग पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दिली तेथे आरोपी मोहम्मद आयुब मो. सुलेमान (वय २९, रा. रतनपूर वार्ड नं ९  विरोली बाजार, फेनी सदर, जिल्हा फेनी. बंगलोर) याच्या विरुद्ध  शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली असून.
यानंतर तात्काळ गुन्हा व आरोपी भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला आसून गु.र.नं. ५८१/१७, भा.दं.वि.३५४, सह  १४ विदेशी नागरीक कायदा प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एएसआय  राजू पवार करीत आहे.आरोपीस दुपारी भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले.
 मुंबई येथे गुन्ह्याची नोंद होताच अटक करण्यात आलेल्या आरोपीस एएसआय शिर्के, पो.कॉं.पाटील, कॉं. नरवाडे यांनी आरोपीस भुसावळ लोहमार्ग पोलिसात दाखल केले.

LEAVE A REPLY

*