Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे

कृषी विद्यापीठासाठी युवा सेना आक्रमक : दोन मार्चला धुळे बंदची हाक

Share
धुळे । प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे एका कार्यक्रम कृषी विद्यापीठाला जळगाव येथे तत्वतः मान्यता देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता कृषी विद्यापीठासाठी युवासेना देखील आक्रमक झाली आहे. कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्याचे हक्काचे आहे. ते मिळविण्यासाठी आता युवासेनेतर्फे उद्या दि. 25 पासून महिनाभर दररोज विविध आंदोलने करण्यात येणार आहे. त्यात 2 मार्च रोजी धुळे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विद्यापीठासाठी युवासेनेची आज बैठक झाली. त्यात अ‍ॅड.पंकज गोरे यांनी भूमिका मांडली. कृषी विद्यापीठ धुळ्यातच होण्यासाठी बैठकीत युवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. कृषी विद्यापीठाबाबत लवकरात लवकर धुळ्याच्या बाजूने निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील मंत्र्यांना जिल्हा बंदीसह त्यांच्या गाड्या अडविण्यासाठी युवक पुढे येतील असा इशाराही देण्यात आला.

कृषी विद्यापीठासाठी धुळेकर गेल्या तीन वर्षापासून विविध मार्गांनी लढा देत आहेत. असे असतांना माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठ जळगाव येथे देण्यास होकार दर्शवणे म्हणजे हा धुळेकरांचा अपमान आहे. तो कदापी सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी युवासेनेतर्फे देण्यात आला. बैठकीत  दि. 25 पासून महिनाभर दररोज विविध आंदोलने करण्याचा निर्धार करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!