Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

देवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर    

Share
रावेर | प्रतिनिधी :  शिवरायांनी कृष्णनीतीचा वापर करून राजनीती केली.या नितीतून समाजकारण व राजकारण केले. शिवरायांचा इतिहास पहिला तर लहानपणी स्व:ताचा घराचा साधा उबरा ओलांडता येत नव्हता, त्यांनी २८४ किल्याचे प्रचंड मोठ साम्राज्य उभ केले. ज्याला स्वत: लाळेत माती खावीशी वाटत होती, त्याने आजूबाजूच्या पाचही शाह्यांना मातीचा रुई,ज्याला लहानपणी हाताच्या मुठीत चंद्राची किरणे पकडाविशी वाटत होती,त्यांच्याच राजमुद्रेत प्रतीपश्चान्द्रलेखे विश्ववंदिता अस लिहाण्याची वेळ त्यांनी आणली. त्यामुळे शिवरायाचा इतिहास प्रचंड धगधगता आहे. त्यांच्या संपूर्ण इतिहासात अफजल खान प्रकरण महत्वाच आहे.हिंदवी स्वराज्य उभ राहत असताना,स्वराज्यावर हे संकट आल होते.यातून शिवरायांच्या कुशलयुद्धनीतीची प्रचीती आली.असे अनेक प्रसंग सांगून जेष्ठ सिनेअभिनेता तथा व्याख्याते राहूल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
  शिवजयंती निमित्ताने येथिल राजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळाच्यावतीने आयोजित प्रताप गढ एक मंत्रयुध्द या विषयावर व्याख्यानात ते विचार मांडत होते. यावेळी माजी आमदार शिरीषचौधरी,नगरसेवक अॅड.सुरज चौधरी,राजू महाजन, माऊली हॉस्पीटल डॉ. संदीप पाटील,यावल येथिल नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,तहसिलदार विजयकुमार ढगे,सेवा निवृत्त नायब तहसिलदार सी.एच.पाटील,दिलीप शिंदे,डॉ.एस.आर. पाटील, किशोर पाटील,कांतीलाल बुवा,अॅड.एल.के.शिंदे, युवराज महाजन, संभाजी ब्रिग्रेड तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, योगेश महाजन,रंगपंचमी व्याख्यान मालेचे विठोबा पाटील, प्रभूदत्त मिसर,अॅड.रविंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी व नागरिक महीला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी पुलवामा हलवण्यात शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच शहरातील क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचा याठिकाणी गौरव करण्यात आला आहे. वक्त्याचा परिचय दिलीप वैदय यांनी करून दिला.पुढे बोलताना सांगितले कि,१६४२ मध्ये १२ वर्षाचे असताना शिवाजी महाराज पुण्यात आले.दोन वर्षांनी राज्य निर्मितीचे स्वप्न पहिले,६४४ हिंवी स्वराज्यासाठी पाहिलं पाऊल टाकल,देवगिरी पडल्यानंतर अंधकारात गेलेल्या महाराष्ट्राला स्वराज्यची फुंकर घालण्याचे काम त्यांनी केले.आदिलशाही,कुतुबशाही यांच्याकडून किल्ले,बंदरे काढून १४ वर्षात हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला.
१६५७ मध्ये मोघालाचा राजपुत्र औरंगजेब आदिलशहाच्या तावडीत सापडला होता.मात्र खानए मोहम्मद वाजीरेआजमने वेढा तोडून औरंगजेबाला पळू दिले.१६५९  मध्ये अफजल खानाचा वध झाला.या १५ वर्षात  शिवाजी महाराज यांनी १५ किल्ले  गोळा केले होते.शिवाजी महाराज यांचे सैन्य आदिलशाही फक्त २१ पट होते,मोघल ३३ पट होते.शिवरायांचे चित्र औरंगजेब यांच्या भेटीपूर्वी फ्रेंच चित्रकाराने काढले होते.ते आता लंडन येथे आहे.अफजल खान शिवाजी महाराज यांना पकडायला आला त्यावेळी महाराज गोवा जवळ होते.
अफजल खानने १६५७ मध्ये तुळजापूर मंदिरातील भवानी मातेच्या मंदिरात धुडगूस घातला,स्वराज्यात मोठी दहशत पसरली होती.तो पंढरपूर येथे हल्ले करेल हा अंदाज बांधून महाराज यांनी मंदिराच्या बडव्याच्या मदतीने गाभाऱ्यातील मूर्ती भुईघरात लपवून ठेवली.त्यावेळी अफजल खानाने मंदिरात गायीची कत्तल करून मंदिरात दहशत माजवली,महाराष्ट्र प्रचंड भीतीत असताना गुप्तहेरला मंदिरात पाठवून लपवून ठेवलेली मूर्ती बसवून पुन्हा लोकांमध्ये विश्वास निर्माण केला,असे अनेक दाखल देत राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांचा इतिहास उलगडला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!