चाळीसगाव न.पा.च्या सर्वसाधरण सभेत विरोधक व सत्ताधार्‍यांकडून आरोग्य सभापतीची कोंडी

0

चाळीसगाव |  प्रतिनिधी  : चाळीसगाव न.पा.च्या बुधवारी झालेल्या सर्वसाधरण सभेत, घंटा गाडी टेंन्डर प्रक्रिया लांबविल्याचा ठपका आरोग्य अधिकारी संजय गोयर यांनी आरोग्य सभपातीवर ठेवल्यानतंर याच विषयाला धरुन, भाजपाचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती घृष्णेश्‍वर पाटील यांची विरोधी आणि त्यांच्याच पक्षातील काही सत्ताधारी नगरसेवकांनीही कोंडी केल्यामुळे न.पा.च्या सर्वसाधरण सभेचे वातावरण चांगलेच तापले होते.

सत्ताधारी भाजपाच्या गटनेत्यांसह काही नगरसेवकांनी आपल्याच नगरसेवकांची बाजू न घेतल्यामुळे दिवसभर अनेक चर्चांना ऊत आला होता

न.पा.च्या गेल्या दोन सर्वसाधरण सभे पेक्षा ह्या यासेभत विरोधी व सत्ताधार्‍यातील काही नगरसेवकांनी हात मिळवणी केल्याचे दिसून येत होते.त्यामुळे भाजपासाठी येणार्‍या काळात न.पा.ची सत्ता आबाधित राखण्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट जाणवत होते.

चाळीसगाव नगर परिषदेची मुख्याधिकारी अनिकेत मानरोकर, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभागृहात जवळपास सत्ताधारी व विरोधी गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातील विरोधकानी सर्वसाधरण सभेचे व्हि.डी.ओ.चित्रीकरण करण्यात यावे, हा मुद्दा उपस्थित केला, याला सत्ताधारी भाजपाच्या नगराध्यक्षांसह नगसेवकांनी विरोध दर्शवल्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच गदारोळ झाला.

त्यानतंर विरोधी गटनेते राजीव देशमुख यांनी सर्वसाधारण सभेपुढे अजेंड्यावरील चर्चसाठी घेण्यात आलेला पहिल्याच विषयावर हरकत घेतली. यावेळी त्यांनी मागील सभेत आम्ही दुरुस्त्या सुचवलेल्या शहर विकासा संबंधीत बाबीची दुरुस्ती केली गेली का असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर सत्ताधार्‍यांना समाधान कारक उत्तर देता न आल्यामुळे बर्‍याच वेळ मागील सभेच्या इतिवृत्तवरुन वाद झाला.

राजीव देशमुख यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केल्या नतंर घंटा गाडी निविदा प्रक्रियाचा विषया पुढे आला. यावेळी आरोग्य अधिकारी संजय गोयर यांच्यावर विरोधकांडून प्रश्‍नांचा भडीमार सुरु झाल्यानतंर त्यांनी घंटा गाडीचे कोट्यावधी रुपयांचे टेन्डर हे भाजपाचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील यांनी मला लांबविण्यास भाग पाडल्याचा सभागृहात थेट आरोप करुन, तोडांवर उघडे पाडले.

यामुळे सभागृहात विरोधकांनी एकच गदारोळ केला. यावेळी घृष्णेश्‍वर पाटील हे कोडीत सापडल्याचे पाहुन, त्यांच्याच सत्ताधारी काही नगरसेवकांना आतुन चांगल्याच गुदगुदळ्या होत होत्या. तसेच सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी यांनी देखील घृष्णेश्‍वर पाटील यांची बाजू न घेता, विरोधकांच्या सुरात सुर मिळवून घृष्णेश्‍वर पाटील यंाना एकटे पाडले.

यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका विजया पवार व नगराध्यक्षा अशालता चव्हाण यांनी घृष्णेश्‍वर पाटील यांची बाजू घेत, आरोग्य अधिकारी संजय गोयर यांनी तुमच्याकडे काही लेखी पुरावा आहे का असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच घृष्णेश्‍वर पाटील यांनी देखील केलेला आरोप सिध्द झाल्यास मी संपूर्ण सभागृहाची जाहिर माफी मागीतल्याचे स्पष्टीकरण दिले.

सर्वसाधारण सभेत एकूण १६९ विषय माडण्यात आले होते. यात जलतरण तलाव भाडे तत्वावर देणे, सन २०१७-०१८ करीता हार्ड मुरुम निविदा, हातफोड खडी पुरविण्याच्या निविदा, बारीक वाळू पुरविण्याची निविदा, सिमेंट पुरविण्याच्या निविदा, दगडी ढापे पुरविण्याच्या निविदा, मजुरीच्या दराने कामे करण्याच्या निविदा, लोखंडी ट्रीगार्ड निविदा, बांबूचे ट्रीगार्ड पुरविण्याचा निविदा, खाजगी नर्सरी मधून रोपे पुरविण्याच्या निविदा, भाजलेल्या व सिमेंटच्या विटा पुरविण्याचा निविदा, हातपंप दुरुस्तीच्या निविदा, संगणक स्टेशनरी खरेदी निविदा आदि विषयवर विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले, यावेळी सत्ताधार्‍यांनी समाधान कारक उत्तरे देता आली नाही.

या विषयांवर झाली वादळी चर्चा-

विषय क्रमांक १४९ अन्वय भूयरी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन, अतर्ंगत शहरातील भूभागाचे सर्वेक्षण, लेव्हल प्लॅनत तयार करणे, व योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करणे आदि कामे करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची(पीएमसी) ची नेमणूक करण्याची निविदा प्रकरणी विरोधकांनी सत्ताधार्‍याना चांगलेच धारेवर धरले.

बर्‍याच वेळ या विषयावर चर्चो झाल्यानतंर सत्ताधारी व विरोधक यांच्यात तु तु, मैं मैं झाली होती. शेवटी विरोधकांनी त्यांचा विरोध नोंदवून घेण्यांचे सांगीतले. तसेच विषय क्रमांक १५६ नूसार शहरात शिवसृष्टी संकल्पना साकार करणे बाबत जागा न.पा.च्या नांवे करुन घेण्याच्या विषयावरुनही विरोधकांनी सत्ताधार्‍यांनी शहरातील नियोजित जागी, शिवपुतळ्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला.

यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये अनेक वेळा खंडाजगी उडाली. शेवटी अनेक ठिकाणी विरोधकांनी विरोध नोंदवून १६९ विषय मजुंर करण्यात आले.

मुख्याधिकारी यांचा अभिनंदनाचा ठराव

सभेच्या सुरुवातीलाचा गोंधळ सुरु असताना नगरसेवक नितीन पाटील यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी अनिकेत मानरोकर यांचा अभिनंदनाचा ठरावाचा मुद्दा उपस्थित केला.

त्यानतंर नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी सर्व सभागृहातील सदस्यानाच्यावतीने मुख्याधिकारी यांचे सत्कार करण्यांची विनंती केल्यानतंर गटनेते राजीव देशमुख व राजेंद्र चौधरी यांनी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचा पूष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले.

यांनी घेतला वादळी चर्चत सहभाग

बुधवारी झालेल्या सर्वसाधरण सभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. या चर्चत गटनेते राजीव देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, सुर्यकांत ठाकुर, सायली जाधव, राजेंद्र चौधरी, अण्णा कोळी, सुरेश स्वार, नितीन पाटील विजया पवार, सविता राजपूत आदिनी सक्रिय सहभाग घेत सभागृहाचे लक्ष वेधुन घेतले.

LEAVE A REPLY

*