आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा

0
जळगाव |  प्रतिनिधी :  आजच्या युवकांमध्ये धुम स्टाईलने गाडी चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाती पालक दुचाकी देत असल्याने मुले जीवाची परवा ना करता जोरात वाहने चालवितात. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. या अपघातांमध्ये मृत्यू होणार्‍यांची संख्या अधिक असून तरुणांनी आपल्या आई-वडीलांचे स्वप्न साकारण्यासाठी वाहतुकीने नियम पाळावे असे प्रतिपादन नवी मुंबई येथील तज्ज्ञ विनय मोरे यांनी केले.

जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे आज मू.जे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानातर्ंगत वाहनधारकांचे मृत्यू या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे होते तर व्यासपीठावर अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंग, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, पत्रकार विजय बुवा, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमूख, सतिश भामरे, प्रसन्न कुमार उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो. त्यातच आपल्याला घडवतांना अनेकांचे योगदान असते त्यामुळे आपल्या जीवाची किंमत ही अमूलाग्र असते. मात्र काही लहान लहान चूकांमुळे व अतिघाईमुळे आपल्याला रस्ते अपघात जीव गमवावा लागतो.

या अपघातात मृत्यूमूखी पडणार्‍यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. अपघातात विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया तर जातेच मात्र नाहक त्रास देखिल सहन करावा लागतो. जो पर्यंत वाहन पार्कींग मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षीत नसतात.

तसेच परवाना नसतांना देखील अनेक लोक वाहने चालवितात तर ज्यांच्याकडे परवाना आहे ते पोलीस कारवाई करतील या भितीपोटी लायसेन्स सोबत बाळगतात मात्र स्वत:च्या जीवना विषयी ते गंभीर नसतात जरी आरटीओ विभागातर्फे वाहन परवाना मिळत असेल तरी तो आपल्याला वाहन परीपूर्ण पणे चालविता येते की नाही हे पाहुनच स्वीकारला पाहिजे आणि याची सुरूवात आपल्यापासूनच तरूणांनी केली पाहिजे.

रस्त्यांवर पहिला अधिकार हा माणसाचा आहे कारण अगोदर माणुस आला मग रस्ते त्यामुळे वाहन चालकांनी मानसिकता चांगली ठेवूनच वाहने चालविली पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी पोलिस अधिक्षकांनी मनोगत व्यक्त करून जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण देखिल अधिक आहे दररोज दोन जणांचा तरी बळी जात असतो.

यात तरुणांची संख्या ही अधिक आहे. त्यातच घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडीलांचा सहाराच राहत नाही त्यामुळे अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

शाळा, महाविद्यालयातील तरूणांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमूख यांनी मानले.

LEAVE A REPLY

*