बर्म्युडा ट्रँगलजवळ गूढ बेटाची निर्मिती

0
न्यूयॉर्क | वृत्तसंस्था :  पृथ्वीच्या पाठीवरील रहस्यमय ठिकाणांमध्ये अटलांटिक महासागरातील ‘बर्म्युडा ट्रँगल’ नावाने ओळखला जाणारा विशेष त्रिकोणीय भाग सर्वात अव्वल आहे. बार्बाडोस, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिकोदरम्यानच्या या पाच हजार किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या शंभर वर्षांत ७५ विमानं आणि १०० हून अधिक जहाजं बेपत्ता झाली आहेत

. विशेष म्हणजे या विमान किंवा जहाजांचे अवशेषही कधी सापडू शकलेले नाहीत. या बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य काही महिन्यांपूर्वी उलगडलं असं वाटत असतानाच आता यासंबंधीची आणखी एक गोष्ट समोर आली आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये केप पॉईंटजवळ एक बेट तयार झाले असून स्थानिकांनी या गूढ बेटाला ‘शेली आयलँड’असे नाव दिले आहे.

हे नवे बेट पूर्णपणे शिंपल्यांनी आच्छादलेले आहे, म्हणून स्थानिकांनी या बेटाला ‘शेली आयलँड’ म्हणण्यास सुरुवात केली आहे. बेट पाहण्याचं कुतूहल लोकांमध्ये निर्माण झाले आहे. मात्र, या बेटाच्या जवळ न जाण्याचं आवाहन लोकांना करण्यात आले आहे.

या ठिकाणी लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच या भागात शार्क आणि स्टिंग रे देखील असल्याने ते हल्ला करू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात बर्म्युडा ट्रँगल विषयी रहस्य उघड करण्यात आले होते. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षटकोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात.

यासोबत १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात. या ङ्गेर्यात अडकून जहाजं बुडू शकतात आणि विमानंही समुद्रात पडण्याची दाट शक्यता असते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता,

पण आता बर्म्युडा ट्रँगल भागात तयार झालेल्या या नवीन बेटामुळे शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकले आहे!

LEAVE A REPLY

*