Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

यंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी

Share
जळगाव । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. कारण, यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेपासून प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलण्यात आले असून ते विद्यार्थ्यांशी अनुकूल असे अधिक झोपे करण्यात आले आहे. त्यानुसार, सीबीएसईने वस्तूनिष्ठ प्रश्नांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजवर प्रश्नपत्रिकांमध्ये 10 टक्के वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात होते. मात्र, आता यात वाढ करुन ते 25 टक्के करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा देतांना आत्मविश्वास वाढेल तसेच त्यांना परीक्षेत अधिक गुणही मिळवता येतील असे बोर्डाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत शंका असेल किवा त्याला उत्तर येत नसेल तर त्याच्याकडे 33 टक्के जास्त प्रश्न उपलब्द असतील. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना विविध प्रकारे उत्तरे लिहिता येतील असे अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्ययेक पेपरला उपविभागांमध्येही विभाजीत केले जाणार आहे. उदारहणार्थ, सर्व वस्तूनिष्ठ प्रश्न एकाच भागात विचारण्यात येतील. त्यानंतर अधिक गुणांच्या प्रश्नांचा भाग असेल.

वस्तूनिष्ठ प्रश्नांव्यतिरिक्त इतर प्रश्न हे भागांमध्ये विभागलेले नसतील. तसेच ते कोणत्याही क्रमाने विचारले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोईने चांगल्या प्रकारे परीक्षा देता येईल, असे सीबीएसईच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यावर्षी सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी 12 वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. दोन दिवसांनी अर्थात 15 फेब्रुवारीपासुन या परीक्षा सुरु होणार आहेत.

प्रश्नपत्रिका फुटण्यापासून रोखण्यासाठीही यावेळी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. संवेदनशील वस्तूंना एकत्र करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय अधिक्षकांना विशिष्ट मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लाईव्ह पद्धतीने नजर ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!