Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

#Video # देशदूतच्या  ‘राजा रयतेचा’ विशेष पुरवणीचे चाळीसगावला आमदारांनी केले प्रकाशन

Share

चाळीसगाव । दि. 18 । प्रतिनिधी :  शिवाजी महाराच्या जिवनपटावर आधारित ‘राजारयतेचा’ या देशदूतच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन चाळीसगाव येथे संभाजी सेनेच्या कार्यक्रमात आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार उन्मेष पाटील, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, डॉ. विनोद कोतकर, संभाजीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाठ, अ‍ॅड.आशाताई शिरसाठ, देशदूतचे उपसंपादक मनोहर कांडेकर आदि उपस्थित होते. देशदूतच्या पुरवणीचे आमदार यांनी कौतूक करत, विशेष वाचनीय असल्याचे मत व्यक्त केले.

चाळीसगाव येथे शिवप्रेमीच्यावतीने काढण्यात आलेली शिव जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीतील ढोला-ताशाचा गर्जर, भगवे झेडे, झोड्यवर स्वार छत्रपतीच्या वेशभूषातील छत्रपती शिवाजी महाराज व मावळे, यामुळे संपूर्ण शहर आज शिवमय झाल्याचा प्रत्यक्ष चाळीसगावकरांना येत आहे.

यंदा सर्वाधीक विविध संघटनाच्यावतीने शिवजयंती साजरी केली जात आहे. तसेच घराघरात सुध्दा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जात आहे. शिवप्रेमीच्यावतीने मिरवणुकीत शिवाजी महाराच्या जवळपास 50 फुटांचे बॅनर झळकवण्यात आले. हे विशेष आकर्षण शहवासियांसाठी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!