मोढाळ्याजवळ डांळींबाचा ट्रक उलटला : चालक व क्लिनर जखमी

0

पारोळा | श.प्र. : तालुक्यातील मोंढाळे प्र.अ.  येथील महामार्गावरील हॉटेल गुजरातसमोर नाशिक येथून डांळींब भरून पाटण्याकडे जाणारा ट्रक उलटून चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रक क्र.एमपी २० एचबी ५४१७ वरील चालक फय्युम शरीफ अन्सारी यांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो उलटला. त्यात त्याच्यासह क्लिनर रमेश बी शर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला मोटार अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

*