वरूणराजाच्या साक्षीने पांडुरंगाच्या नामाच्या गजरात पिंप्राळा नगरी दुमदुमली : हजारो भाविकांनी ओढला विठ्ठलाचा रथ

0
पंकज पाटील |  जळगाव | दि.४ | टाळ मृदंगाच्या गजरात विठूच्या नामस्मरणात वरूणराजाच्या साक्षीने येथील पिंप्राळा नगरी दुमदुमली.

निमित्त होते पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या विठ्ठल रथोत्सवाचे. आषाढी एकादशी निमित्ताने गेल्या १४२ वर्षांपासून श्री. विठू रायाचा रथोत्सव काढण्यात येतो.

सकाळी ७ वाजता पंढरीनाथ विठ्ठल वाणी यांच्या हस्ते विठठलाची महापूजा करण्यात आली. दुपारी १२.३० वाजता सुरेश मुरलीधर वाणी यांच्या हस्ते सपत्नीक रथाची महापुजा करण्यात आली.

माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आ. राजुमामा भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी रथाची विधिवत पूजा करून रथ ओढला. टाळ मृदुगाच्या गजरात विठू नामाच्या भजनात रथोत्सवास मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली.

रथोत्सवास सुरवात झाल्यानंतर काही वेळातच झिमझिम पावसास सुरवात झाली. दरवर्षी पिंंप्राळ्याच्या श्री. विठ्ठलच्या रथोत्सवात पाऊस पडत असतो.

या रथोत्सवाचा व्हिडीओ देशदूत फेसबूकवर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

*