लावाचा हेलिमय १४ नोटबुक

0
लावाचा कंपनीने हेलियम १४ या मॉडेलच्या माध्यमातून पहिले नोटबुक बाजारात उपलब्ध केले आहे.
स्मार्टफोनच्या क्षेत्रात चिनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना अक्षरश: धडकी भरविली आहे.

या पार्श्‍वभूमिवर मायक्रोमॅक्सारख्या कंपन्यांनी आधीच स्मार्टफोनशिवाय अन्य उत्पादनांकडे लक्ष वळवण्याचा पवित्रा घेतला आहे. नेमक्या याच पध्दतीने आता लाव्हा या दुसर्या भारतीय कंपनीने नोटबुक क्षेत्रात पदार्पण करत हेलियम १४ हे पहिले मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे आहे.

यात १४.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिला असून याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. तसेच मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा व १० हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून हे मॉडेल विंडोज १० या प्रणालीवर चालणारे असेल. हेलियम १४ हे नोटबुक १४ हजार ९९९ रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*