चिंचोलीच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा शताब्दी महोत्सवाला दि.६ मे पासुन प्रारंभ

0

चिंचोली ता यावल (वार्ताहर ) : येथील प्रख्यात असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराचा शताब्दी महोत्सवाला येत्या ६ मे पासुन प्रारंभ होत असुन आठ दिवस चालणा-या ह्या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून जिल्हा भरातील भक्तगण या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
येथिल लक्ष्मी नारायण मंदिराचे पहिले गादीपुरूष वै.वा.श्री सद्गुरू सच्चिदानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मंदिराचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे ही पंरपंरा गेल्या एक दशका पासुन सुरू आहे.

शंभरहुन अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा पाया सच्चिदानंद महाराजांनी घातला होतां. १८५६ – ५७ मध्ये तात्या टोपे यांना पकडण्याचे आदेश दिले होते.

तात्या टोपे यांचे जवळचे नातेवाईक असलेले सच्चिदानंद देशपांडे महाराज हे नगर जिल्ह्यातील पुणतांबे जवळील संवत्सर येथे राहत असत.त्यावेळी इंग्रजांनी देशपांडे यांचा वाडा तोफेने उडवुन देण्याचा कट रचला होता .

त्यावेळी सच्चिदानंद महाराज हे आपल्या कुटुंबियांच्या सह चिंचोली येथे वास्तव्यास आले.त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत रामाची मुर्ती आणली होती. एका लहानशा झोपडीत ते रामाची मुर्ती ची पुजाअर्चा करीत.

एक दिवस ते राहत असलेल्या झोपडीला आग लागली आणि त्यात त्यांचे संपूर्ण घर म्हणजे झोपडी नेस्तनाबूत झाली.

मात्र या आगीतुन त्यांनी सोबत आणलेली रामाची मुर्ती जशी ची तशीच राहिली. त्यामुळे महाराजांनी त्याच जागेवर मंदिर बांधण्याची इच्छा बोलुन दाखविली.

त्यावेळी परीसरातुन लोकवर्गणी जमा करून १९०२ मध्ये पुणे येथील कारागीर बोलावुन पुणे येथील सारसबागे समोरील मार्केडेय मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली.

यावेळी पारगाव ता .चोपडा येथिल श्री कुलकर्णी यांनी लक्ष्मी नारायणाची मुर्ती जयपुर येथुन आणली असल्याचे सांगितलं जाते.हिच मुर्ती याच मंदिरात प्रतीष्ठापित केली आहे.

त्यामुळे कोणी या मंदिरास राम मंदिर तर कुणी लक्ष्मी नारायणचे मंदिर म्हणुन संबोधित आहेत.

सच्चिदानंद महाराज यांचे यावल येथे ही शिष्य होते. यावल येथे महाजन वकील या शिष्याकडेच त्यांचे निधन झाल्याचे समजते.

त्यांचा पुण्यतिथीचाच कार्यक्रम म्हणून गेल्या एक दशकापासुन भाविकांनी सुरू केलेला हा उत्सव आजही तेवढ्याच भक्तीभावाने त्यांचे शिष्यगण व मंदिर संस्थान चे चौथे गादी पुरुष ह.भ.प.ऋषिकेश महाराज व त्यांचे शिष्यगण साजरा करतात.

पालखी सोहळा व भारूळांचा कार्यक्रम

दि.१२ मे शुक्रवार रोजी वै.वा. सच्चिदानंद महाराज यांच्या पादुका ची पालखी सोहळा व रात्री हभप रघुनाथ महाराज फुलब्रीकर व जोशी महाराज जामनेर यांचा भारूळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पालखी संपुर्ण गावातुन प्रर्दशना घालुन हनुमान मंदिरातील चौकात रात्री भारूळांचा कार्यक्रम संपन्न होत असतो. यावेळी असंख्य भाविकांची उपस्थिती लाभणार आहे.

LEAVE A REPLY

*