Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

पुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको

Share
ठाणे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला. नागरिकांच्या या आंदोलनामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
आज सकाळी अचानक नालासोपारा रेल्वे स्थानकावर जमलेल्या प्रवाशांनी पाकिस्तान विरोधी घोषणा द्यायला सुरूवात केली. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत शेकडो प्रवासी रेल्वे मार्गावर उतरले आणि त्यांनी रेल्वेची वाहतूक रोखून धरली. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!