जळगावातील पांडे डेअरी चौकातील इंडीयन ऑईलच्या पेट्रोल पंपाची तपासणी : विक्री बंद : ठाणे क्राईम ब्रॅचच्या अधिकार्‍यांची कारवाई

0
जळगाव | प्रतिनिधी : येथील पांडे डेअरी चौकात असलेल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपाची ठाण्याच्या क्राईम बॅ्रचच्या अधिकार्‍यांनी आज सकाळीच तपासणी सुरू केली. तपासणी करूनपेट्रोल व डिजेलचे नमुने त्यांनी तपासणीसाठी घेतले आहे. दरम्यान या पेट्रोलपंपावरील डिजेल व पेट्रोलची विक्री थांबविण्यात आली आहे.

यावेळी इंडीयन ऑईल कंपनीचे अधिकारी, वजन मापे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ठाणे ये लि इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपावर भेसळ आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने मापात पाप करणार्‍या पंपावर कारवाई करण्यात आली होती.

त्या पार्श्‍वभूमिवर जळगावातही ही तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत घेतलेले नमुने जर दोषी आढळले तर पेट्रोलपंपावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. हे अहवाल येईपर्यंत या पंपावरील विक्री थांबविण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*