फैजपुरला धनाजी नाना महाविद्यालयात रविवारी हिंदी साहित्यावर राष्ट्रीय संगोष्ठी

0

फैजपूर,ता.यावल । दि.12। वार्ताहर :  येथील धनाजी नाना महाविद्यालयाचा हिंदी विभाग व उत्तर महाराष्ट्र हिंदी प्राध्यापक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.17 रोजी धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय हिंदी संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे.

यात हिंदी साहित्याविषयी चर्चा होईल.कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता होईन. अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी हे असतील. तर पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.सदानंद भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ.मधुकर खराटे हे उपस्थित राहतील. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रो.डॉ. दत्ता मुरूमकर यांचे बीजभाषण होईल.

दुपारी 1 ते 3.30 वा. होणार्‍या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.सुनील कुळकर्णी हे असतील. तर दु. 2 ते 3 या वेळेतील दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी जळगावच्या मु.जे. महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुरेश तायडे हे असतील.

कार्यक्रमाचा समारोप दुपारी 3.30 ते 5 वा. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे माजी सदस्य डॉ.कृष्णा पोतदार यांच्या उपस्थितीत होईल. तरी या संगोष्ठीस हिंदी विषयाचे प्राध्यापकांनी उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*