# Photo Gallery # मेहनत, दूर्दम्य ईच्छाशक्तीनेच यशाला गवसणी : डी.बी.पाटील

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयात ‘धनोत्सव 2019’ स्नेहसंमेलनात कलाविष्कारांची रेलचेल

0
(सर्व छायाचित्रे : अरूण होले, फैजपूर)

फैजपूर, ता.यावल। वार्ताहर :  नियमीतपणा,सातत्य चिकाटी व आत्मविश्वासाने प्रयत्न करून कोणतेही क्षेत्र या महाविद्यालयीन जीवनातच गाठता येतात असे प्रतिपादन नागपूरच्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी सहसंचालक प्रा. डी. बी. पाटील यांनीतापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन धनोत्सव 2019 च्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी केले.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी होते.उपप्राचार्य डॉ. ए. आय.भंगाळे, डॉ. यु. एस. जगताप, प्रा. ए. जी. सरोदे, प्रा.डी. बी. तायडे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. गोविंद मारतळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. गोपाळ जी. कोल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील चौधरी, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु.प्राजक्ता प्रकाश काचकुटे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. डी. बी पाटील पुढे म्हणाले की, प्रत्यकाच्या अंगी काही सुप्त गुण असतात.आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत हे ओळखून त्या गुणांना विद्यार्थ्यांनी विकसित करावे. या गुणांच्या आधारावरच उत्कृष्ट समाजकारणी, राजकारणी बनू शकतात त्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, नियमीतपणा,सातत्य चिकाटीने व आत्मविश्वासाने प्रयत्न करून कोणतेही क्षेत्र या महाविद्यालयीन जीवनातच गाठता येतात. असे मत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन या साधनाचा योग्य वापर करा असे सांगीतले.

तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी उपस्थित होते. त्यांनी तरुणाईचा जल्लोष उत्साहित करण्यासाठी छुपे रुस्तम ही बहारदार कव्वाली सादर केली.

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी मराठी गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला.यासोबत पोस्टर सादरीकरण, सलाद डेकोरेशन, मॉडेल, खाना खजाना, फनी गेम्स, आणि नेल आर्ट आदी कलाप्रकार सादर करून उपस्थितांची वाह वाह मिळविली.

परीक्षक म्हणून पोस्टर सादरीकरणासाठी प्रा . डॉ. एन. एल. चव्हाण, प्रा. डा.ॅ ए. के. पाटील, प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रा. डॉ. के. जी. पाटील, प्रा. वंदना बोरोले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजश्री नेमाडे यांनी तर आभार कु. ऐश्वर्या झोपे हिने केले.

वेशभूषेने परिसरात चैतन्य

वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्यात. तर वक्तृत्व वादविवाद, काव्यवाचन स्पर्धा , निबंध लेखन, केशरचना, नेलआर्ट, विविध मॉडेल तयार करणे या स्पर्धा घेण्यात आल्यात. स्पर्धांचे उदघाटन उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.आय. भंगाळे यांनी केले. परीक्षण डॉ.जगदिश पाटील, डॉ. सतिष चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जगदिश खरात यांनी केले. आभार प्रा.सतिष पाटील यांनी केले .

पारंपारिक वेषभुषा स्पर्धेत भारतीय विविध वेषभुषेचे दर्शन घडले या स्पर्धेचे आयोजन प्रा.डी.आर .तायडे यांनी केले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा.वंदना बोरोले, सचिन भिडे, डॉ .पंकज सोनवणे, प्रा. आरती भिडे यांनी पाहिले.

केशरचना आणि नेलआर्ट या स्पर्धेचे आयोजन डॉ. सविता वाघमारे, डॉ. कल्पना पाटील ,प्रा.सूजाता भंगाळे यांनी केले. सदर स्पर्धांचे परीक्षण प्रा. डॉ.सिंधू भंगाळे व प्रा.तिलोत्तमा चौधरी यांनी केले. या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी सर्व उपप्राचार्य, डॉ .गोविंद मारतळे, डॉ .गोपाळ कोल्हे ,विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्निल चौधरी ,प्राजक्ता काचकुटे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*