भुसावळ सह परिसरातील ४०० हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

0
भुसावळ |  प्रतिनिधी : जून महिण्याच्या सुरुवातीला झालेल्या तोडक्या पावसात तालुक्यातील बागायतदार शेतकर्‍यांसह कोरडवाहू क्षेत्रातही पेरणी करण्यात आली होती. मात्र मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पीकांचे नुकसान होण असल्याचे चित्र होते.शनिवार व रविवारी झालेल्या पावसाने पीकांना दिला मिळाला असला तरी तालुक्यात जवळपास ३०० ते ४०० हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

जून महिण्यातील मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील ३ हजारावर बागायती व दीड हजारांवर कोरडवाहू क्षेत्रात शेतकर्‍यांनी पेरणी आटोपली आहे.

मात्र संपूर्ण जून महिणा उलटूनही पाऊस न झाल्याने पेरणी करण्यात आलेल्या कोरडवाहू क्षेत्रातील पीकांची वाढ खुंटली होती. पीकांचे नुकसान होत असल्याने पीकानची स्थिती बिकट झाली असल्याने तालुक्यातील ३०० ते ४०० हेक्टर कोरडवाहू क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भिती कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. यामुळे कपाशीचा या वर्षी वाढणारा पेरा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोयाबीन व तुरीला समाधानकारक भाव न मिळाल्याने या वाणांचे क्षेत्र कमी होऊन कपाशीच्या पेर्‍यात नेहमी पेक्षा २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता होती. पाऊस लांबल्याने आतापर्यंत लागवड झालेली कपाशीचे क्षेत्र अपेक्षेपेक्षा कमी आहे.

दि. ७ जुलैैपर्यंत कपाशीची लागवड शक्य असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. कपाशी वाणाची उत्पादन क्षमता जास्त दिवसांची असल्याने कपाशी पेरणीची मुदत संपण्यात असल्याने इरत वाणांंच्या पेरणीला शेतकर्‍यांकडून प्राधान्य देण्यात येईल.

तसेच दुपार पेरणी सृश्य स्थितीमुळे कपाशीच्या पेर्‍याचा वाढता टक्का कमी होऊन सोयाबीन, ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

दि.१ व २ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे तग धरुन असलेल्या पिकांना दिलासा मिळला आहे. पाऊस सतत चालू राहिल्यास लागवडीतही वाढ होईल. तालुक्यातील २३ हजार ९०० हेक्ट पैकी ३ हजार ५०० हेक्टरवर बागायती तर दीड हजार हेक्टरवर कोरडवाहू कपाशीची लागवड करण्यात आली आहे.

त्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने भर पडणार आहे.अजूनही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.शेतकर्‍यांनी कमी दिवसांच्या उत्पादन क्षमतेच्या वाणाची पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, दि.१ रोजी तालुका कृषि विभागाने कृषि दिनानिमित्त तालुक्यातील किन्ही येथे किसान गप्पागोष्टी कार्यक्रमात कृषी तज्ञांनी शेतकर्‍यांना कापूस, कांदा लागवड, आपत्कालीन पीक व्यवस्था, पंतप्रधान पीक विमा, पीक लागवड, हेक्टरी झाडाची संख्या वाढविणे, कमी कालावधींच्या वाणाची पेरणी करणे, ठिंबक वापर, पीक वाचवून अपेक्षित उत्पन्न कसे घेता येईल यावर मार्गदर्शण करण्यात आले होते त्याचा फायदा आता शेतकर्‍यांना होणार आहे.

LEAVE A REPLY

*