नऊ वर्षाच्या मेहनतीनंतर बनवले कागदाचे विमान

0
सॅन ङ्ग्रान्सिस्को | वृत्तसंस्था :  आपण नेहमी उडवतो ती कागदाची विमाने बनवण्यासाठी काही सेकंदच लागतात; मात्र हुबेहूब एखाद्या प्रवासी विमानाची कागदापासून प्रतिकृती बनवायला म्हणजे थोडा वेळ लागणारच.

अमेरिकेतील एका युवा डिझायनरने थोडाथोडका नव्हे तर नऊ वर्षांचा वेळ यासाठी घेतला. सॅन ङ्ग्रॅन्सिस्कोमध्ये राहणारा २५ वर्षीय लुका लकोनी-स्टीव्हर्ट चक्क एअर इंडियाच्या विमानाची इतक्या वर्षांपासून प्रतिकृती बनवत आहे.

त्याने २००८ मध्ये इंटरनेटवर एअर इंडिया बोईंग ७७७ विमानाचा ङ्गोटो पाहिला होता. तो पाहून त्याला अशा विमानाची छोटी कागदी प्रतिकृती बनवण्याची प्रेरणा मिळाली.

स्टीव्हर्टने या कामासाठी आतापर्यंत दहा हजार तास खर्च केले आहेत. या वर्षी ही प्रतिकृती पूर्ण होईल, असे त्याला वाटते. विशेष म्हणजे हे विमान तयार करण्यासाठी त्याने शिक्षणही सोडले आहे! अर्थात विमानातील सर्व बारीकसारीक तपशीलही तो बनवत असल्याने त्याला इतका वेळ लागत आहे.

इकॉनॉमी क्लासमधील एक सीट बनवण्यासाठीच त्याला वीस मिनिटे लागतात. बिझनेस क्लासमधील सीटसाठी चार ते सहा तास आणि ङ्गर्स्ट क्लासची सीट बनवण्यासाठी आठ तास लागतात.

त्याने बनवलेल्या या विमानातील दरवाजेही खर्या दरवाजाप्रमाणेच उघडतात व बंद होतात हे विशेष! इंजिनपासून चाकापर्यंत सर्व गोष्टी त्याने हुबेहूब बनवल्या आहेत.

LEAVE A REPLY

*