श्रीक्षेत्र कपिलेश्‍वर येथे आज तापी जन्मोत्सव

0
कळमसरे, ता.अमळनेर | वार्ताहर :  तापी व पांझरा नदीच्या संगमावर वसलेले कपिलेश्‍वर महादेवाचे मंदिर हे सर्वत्र जागरूक देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.

खान्देशाला सुजलाम सुफलाम करणारी पश्‍चिम वाहिनी, सुर्यकन्या, साधु-संताचा ऋषिमुनींच्या पादस्पर्शाने आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी हंसानंद तीर्थजी महाराजांच्या सानिध्यात  शुक्रवार आषाढ शुक्ल सप्तमी रोजी तापी जन्मोत्सव हजारोंचा उपस्थितीत प्राचिन तिर्थ श्री क्षेत्र कपिलेश्‍वर महादेव मंदिर येथे साजरा होत आहे.

तापी माता जन्मोत्सव पुजन व महाआरतीसाठी सहभागी व्हावे. दुपारी १ ते ३.३० प्रवचन तापी महात्म्य विवेकी, संस्करित, नैतिक समाज घडविणेत ब्राह्मण देवतांचे योगदान असा कार्यक्रम असणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ३ ते ५ या दरम्यान तापीपूजन व महाआरती होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा विश्‍वस्त श्री क्षेत्र कपिलेश्‍वर महादेवमंदिर ट्रस्ट, मुडावद-निम (तापी-पांझरा संगम) व समस्त भक्त परिवार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*