कृषीविभागाचे पुरस्कार जाहीर : जळगाव जिल्ह्यातील चौघांचा समावेश

0

रावेर | प्रतिनिधी :  महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे उत्कृष्ट शेतकर्‍यांना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहिर झाले असुन यात जळगांव जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे.

राज्यात कृषी, कृषीसल्लग्न केंद्र, तसेच फलोत्पादन केंद्रमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती/संस्था यांना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.

सन २०१४ करीताचे कृषी पुरस्करा प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थींची नांवे घोषित करण्यासाठी कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार्‍या व्यक्तींची नांवे जाहिर करण्यात आलेली आहे.

यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार पाचोरा तालुक्यातील लोहारा येथिल शेतकरी विश्‍वासराव आनंदराव पाटील यांना देण्यात येणार असुन वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथिल प्रेमानंद हरी महाजन यांना देण्यात येणार असुन याच प्रमाणे उद्यान पंडित पुरस्कार यावल तालुक्यातील चिंचोली येथिल रविंद्र मार्तंड पाटील(साठे) यांना जाहिर झाला असुन कृषीभुषण (सेंद्रीय शेती) यावल तालुक्यातील भालोद येथिल नारायण शशिकांत चौधरी यांना जाहिर झाला असुन लवकरच पुरस्कार वितरण होणार असल्याचे कृषी विभागाचे अवर सचिव श.बा.पावस्कर यांनी जाहिर केले आहे.

रवींद्र साठे यांना मरणोत्तर पुरस्कार

उद्यान पंडित पुरस्कार यावल तालुक्यातील चिंचोली येथिल रविंद्र मार्तंड पाटील(साठे) यांना जाहिर झाला असुन त्यांचे एक वर्षांपूर्वी वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले आहे.

त्यांनी आपल्या जीवनकाळात शेतीत विविध प्रयोग राबविले. ङ्गुलशेती, केळी, डाळिंबाची त्यांनी लागवड केली. त्यांना दोन मुले आहेत.

LEAVE A REPLY

*