एमपीडीए : अमळनेरच्या फरार नगरसेवकाला अटक

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-अमळनेर येथील नगरसेवक घनश्याम उर्फ शामकांत पाटील (वय 32) याच्यावर अवैध वाळु चोरीसह 10 गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याने जिल्हाधिकारी यांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली होती.
कारवाईची माहिती कळताच घनशाम पाटील फरार झाला होता. पाटील चार महिन्यापासून फरार होता. दरम्यान आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाटील याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी त्याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नगरसेवक घनश्याम पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याने अमळनेर पोलिसांनी एमपीडीच्या कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तात्काळ घनश्याम पाटील यांच्यावर दि.15 फ्रेबुवारी रोजी स्थानबध्दतेची कारवाई केली होती. कारवाईची माहिती कळताच घनश्याम पाटील फरार झाला.

दरम्यान 4 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रविंद्र बागुल,सुरेश पवार, मुरलीधर आमोदकर, निळकंठ पाटील, दिलीप येवले, शशिकांत पाटील, संजय पाटील,विनोद पाटील, नरेंद्र पाटील, विजय पाटील, अशोक चौधरी, संजय सपकाळे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी यांनी त्यांचा शोध घेतला.

दरम्यान पाटील याने खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी धाव घेतली. खंडपीठाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई अटळ होती.

त्यानुसार घनश्याम पाटील हे वकीलांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसात हजर झाले. स्थागुनाच्या पथकाने घनश्याम पाटील याला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले असून स्थानबध्दतेच्या कालावधीसाठी घनश्याम पाटील याला नाशिक कारागृहात रवाना करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या नगरसेवकाचा अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सुगावा लागल्याने त्याला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.

 

LEAVE A REPLY

*