पोषण आहार ठेक्याच्या मुदतवाढीची चौकशी करा !

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-पोषण आहाराच्या ठेकेदाराला मुदतवाढ देवू नये, असे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. शिक्षणमंत्र्यांचे आदेश धुडकावून शिक्षण संचालकांनी महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळे या ठेक्याच्या मुदतवाढीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.
शालेय पोषण आहाराच्या ठेकेदारांकडून पुरविण्यात येणार्‍या तुरदाळींच्या भावात व बाजारभावात मोठी तफावत असल्याने शासनाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

त्यामुळे माहिती कार्यकर्ता रविंद शिंदे यांनी याबाबत शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार देखील केली होती. तसेच आ. खडसे यांनी पोषण आहाराबाबत माहितीच्या अधिकारात माहीती देखील मागविली होती.

ठेकेदार पुरवित असलेल्या तुरदाळींच्या भावात मोठया प्रमाणात तफावत आहे. पोषण आहराचे नवीन टेंडर या महिन्याच्या शेवटी उघडले जाणार असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता असल्याने शिक्षण संचालक विभागाने ठेकेदाराला 30 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच हा प्रकार अंगलट येण्याची शक्यता असल्याने बँक डेटेड तारखेचे आदेश काढण्यात आले आहे.

तसेच शिक्षणमंत्र्यांनी पोषण आहाराचया ठेकेदाराला मुदतवाढ देवू नये असे आदेश निर्गमित केलेले असतांना देखील ठेकेदाराला 30 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याने या मुदतवाढीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. खडसे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.

सीईओंनी कळविली शासनाला माहिती
पोषण आहाराच्या ठेकेदारांकडून पुरविण्यात येणार्‍या तुरदाळीच्या भावात मोठया प्रमाणात तफावत दिसून येत असल्याने जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी शासनाचे नुकसान होत असल्याची माहिती शासनाला कळविली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*