Type to search

Breaking News maharashtra आरोग्यदूत आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

नऊ महिन्यात राज्यात ११ हजार ९३२ बालमृत्यूची नोंद

Share

मुंबई : राज्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न व त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात राज्यात ११ हजार ९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माहितीनुसार, दगावलेली मुले शून्य ते पाच वयोगटातील आहेत. यामध्ये शून्य ते एक वर्ष वयोगटातील ९ हजार ३७९ मुलांचा, तर १ ते ५ वर्षे वयोगटातील २ हजार ५५३ मुलांचा समावेश आहे. कुपोषित मुलांसाठी पोषण आहाराच्या योजना आखल्या जातात, तत्पर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असतील तर हे बालमृत्यू रोखण्यास सरकार अपयशी का ठरते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यामधील उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास केला तर सप्टेंबर २०१ मध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची पोषण स्थिती काळजी करायला लावणारी आहे.

एकूण वजन घेतलेल्या मुलांचे प्रमाण ५८ लाख ७७ हजार २८१ इतके आहे, त्यात साधारण श्रेणीतील ५२ लाख ३५ हजार ९९४ मुले आहेत तर मध्यम कमी वजनाच्या मुलांमध्ये ५ लाख ५२ हजार ९२४ मुलांचा समावेश आहे.

[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]तीव्र कमी वजनाच्या गटात ८८ हजार ३६३ मुले येतात. मध्यम आणि तीव्र कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण ६ लाख ४१ हजार २८७ आहे. गडचिरोली, नंदूरबार य़ेथे कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या खोज या संस्थेच्या बंडू साने यांनी बालमृत्यूच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची निकड व्यक्त केली.[/button]

न्यायालयाकडून सातत्याने निर्देश दिले जातात, तरीही मुलांचे मरण्याचे व कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही. सक्षम आरोग्यसेवा मिळत असतील तर बालमृत्यू कमी व्हायला हवेत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!