Type to search

आवर्जून वाचाच जळगाव

थर्टी फर्स्टची ‘झिंग’ पहाटे पाचपर्यंत

Share

जळगाव । प्रतिनिधी :  थर्टी फर्स्टची ‘झिंग’ यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत करण्याला शासनाने मुभा दिली असून त्याबाबतचे परिपत्रकही राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाले आहे. दरम्यान बनावट दारु आणि परप्रांतातुन होणारी अवैध वाहतुक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पाच भरारी पथके नियुक्त केली आहे.

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहरासह जिल्ह्यात जय्यत तयारी केली जात आहे. थर्टी फर्स्ट मनसोक्त साजरी करता यावी यासाठी शासनाने देखिल शहरी आणि ग्रामीण भागात पार्ट्यांना रंगत आणण्यासाठी हॉटेल्स, परमीट रूमना विशेष परवानगी दिली आहे.

मद्यविक्रीतून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूली उत्पन्न मिळते. त्यामुळे दि. 25, 31 या दोन दिवशी तळीरामांसाठी खास बाब म्हणून यथेच्छ मद्य पिण्याला मुभा दिली जाते. यंदाही थर्टी फर्स्टसाठी राज्य शासनाने परीपत्रक जारी करून वेळापत्रकच जारी केले आहे.

विविध संस्थांकडून थर्टी फर्स्टचे नियोजन

शहरी भागात थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी विविध संस्थांकडुन ऑर्केस्ट्रॉ, डीजे नाईट, कपल डान्सींग, गृप डान्सींगचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टी फर्स्टसह नववर्षाच्या स्वागतासाठी देखिल संस्थांकडून जय्यत तयारी केली जात आहे. काही ठिकाणी कुपन तर काही ठिकाणी तिकीट लावून हे कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

तात्पुरते परवाने वितरीत

शहरी भागात मद्य वाहतुक आणि मद्य पिण्यासाठी वाईन शॉप आणि हॉटेल्स व्यावसायिकांना तात्पुरत्या स्वरूपाचे परवाने वितरीत करण्यात आले आहे. 21 वर्षे वयापेक्षा अधिक असलेल्यांना हे परवाने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

85 ठिकाणी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाला दर महिन्याला 25 ठिकाणी तपासणी करण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात महिनाभरात 85 ठिकाणी एमआरपी म्हणजेच ठरवुन दिलेल्या किंमतीपेक्षा अधिक दराने मद्य विक्री असे आहे वेळापत्रक करणार्‍यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक एस.एल. आढाव यांनी दिली.

असे आहे वेळापत्रक

थर्टी फर्स्टची रंगत वाढविण्यासाठी वाईन आणि बियर शॉपीद्वारे रात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे. देशी दारू विक्रीसाठी देखिल रात्री 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल्स आणि परमीट रूम पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याला परवानगी दिली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक एस.एल. आढाव यांनी दिली. शासनाने जारी केलेल्या या परीपत्रकामुळे तळीरामांची विशेष सोय झाली असुन पहाटे 5 वाजेपर्यंत यथेच्छ ‘झिंग’ चढणार आहे. ही परवानगी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी लागू राहणार आहे.

पाच भरारी पथके नियुक्त

बनावट दारू, परप्रांतातुन होणारी होणारी अवैध वाहतुक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे पाच भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे. यात जळगाव आणि चोपडा तालुक्यासाठी घटकप्रमुख म्हणून एन.बी. दहिवडे, दुय्य्म निरीक्षक विकास पाटील, साखर वानखेडे, करिश्मा मेश्राम, जळगाव, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरासाठी दुय्यम निरीक्षक आनंद पाटील, एम.बी. सोनार, सत्यविजय ठेंगडे, स्वाती इंगळे, भुसावळ आणि यावलसाठी निरीक्षक एस.के. कोल्हे, दुय्यम निरीक्षक के.बी.मुळे, के.एन.बुवा, सुरज गायकवाड, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरासाठी प्र. निरीक्षक वसंत माळी, दुय्यम निरीक्षक रिकेश दांगट, भरत दौड, वैशाली धुरंधर, भुसावळ, यावलसाठी निरीक्षक बी.बी. देवकाते, दुय्यम निरीक्षक व्ही.के.नाईक, जमनाजी मानेमोड, आशमोड हानमलु यांचा या पथकात समावेश आह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!