मुक्ताईनगर तालुक्यातील तीन ग्रा.पं.ची आरक्षण सोडत जाहीर

0
मुक्ताईनगर |  वार्ताहर :  तालुक्यातील सर्वात मोठ्या मुक्तताईनगर तसेच तालुक्यातील इतर तीन ग्रामपंचायतच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

सोडत छत्रपती नाट्यगृहात झाली.सोडतीप्रसंगी महसुल कर्मचारी व नागरिकांमध्ये जोरदार गोंधळ करून खडाजंगी झाली.भाजपातर्ङ्गे आक्षेपही नोंदविण्यात आला.त्यामुळे आरक्षण सोडत गाजली.

तालुक्यातील पिंप्री नांदु, बेळसवाडी व कुर्‍हा अशा चार ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.मुक्ताईनगर ग्रा.पं.च्या एकाच वार्डात तेच आरक्षण कसे? वार्डामध्ये समान मतदारसंख्या असावी,वार्ड क्र.१ चा काही भाग वार्ड क्र.६ ला जोडू नये,वार्ड क्र.५ मध्ये गेल्या पंचवार्षीकमध्ये दोन जागा महिलासाठी राखीव होत्या.

यावेळेसही दोन जागा महिला साठी राखीव कशा? असा सवालही उपस्थित करीत नागरीकातर्ङ्गे आक्षेप नोंदविण्यात आला.प्रभाग रचना व आरक्षण सोडतीसंबधी नागरीकांनी महसूल कर्मचार्‍यांना प्रश्‍न विचारून अक्षरशा कर्मचार्‍यांच्या नाकेनऊ आणले व त्यात महसूल कर्मचार्‍यांचे अपुर्ण ज्ञानाचे दर्शन झाले.

त्यामुळे महसूल कर्मचार्‍यांची अक्षरशा:दमछाक होतांना दिसली.या प्रकारामुळे मात्र नागरिकांतर्ङ्गे गोंधळ करण्यात आलावार्ड१् – ओ बी सी महिला १, जनरल महिला १,वार्ड २्- अनुसुचूत जाती महिला १,अनुसूचित जमाती महिला १, अनुसूचित जाती १,वार्ड ३ – ओ बी सी महिला१,जनरल मागील १, सर्वसाधारण १, वार्ड ४् – ओबीसी १, जनरल१ ,जनरल महिला १, वार्ड५ – ओबीसी १, ओबीसी महिला१, जनरल १, वार्ड ६् -जनरल २, जनरल महिला १ या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

कुर्‍हा-वार्ड क्र. १ मध्ये अनु.जाती स्त्री एक/ अनु जाती सर्वसाधारण एक / सर्वसाधारण एक असे एकूण ३ , वार्ड क्र २ मध्ये अनु जमाती स्री एक/ ओ बी सी स्त्री एक / सर्वसाधारण एक असे एकूण ३ , वार्ड क्र ३ मध्ये अनु जाती स्त्री एक / ओ बी सी सर्वसाधारण एक / सर्वसाधारण एक असे एकूण ३ . वार्ड क्र ४ मध्ये ओ बी सी स्त्री एक /सर्वसाधारण स्त्री दोन असे एकूण ३ \

वार्ड क्र ५ मध्ये ओ बी सी स्त्री/ सर्वसाधारण एक/ सर्वसाधारण स्त्री एक असे एकुण ३ वार्ड क्र ६ मध्ये सर्वसाधारण दोन एकूण २ पिप्री नांदु- वार्ड क्र १ मध्ये अनु जमाती स्त्री एक / ओ बी सी सर्वसाधारण एक/ सर्वसाधारण एक असे एकूण ३\

वार्ड क्र २ मध्ये ओ बी सी स्त्री एक / सर्वसाधारण स्री एक / सर्वसाधारण एक असे एकूण ३ , वार्ड क्र ३ मध्ये अनु जाती स्त्री एक/ अनु जमाती सर्वसाधारण एक/ सर्वसाधारण एक असे एकूण ३,

बेलसवाडी- वार्ड क्र १ मध्ये अनु जाती स्त्री एक / सर्वसाधारण स्त्री एक / सर्वसाधारण एक असे एकूण ३ वार्ड २ मध्ये सर्वसाधारण स्त्री एक / सर्वसाधारण दोन असे एकूण ३ वार्ड क्र ३ मध्ये ओबीसी स्त्री एक / ओबीसी सर्वसाधारण/ सर्वसाधारण स्त्री एक असे एकूण ३ अशा प्रकारे ग्रा.पं.ची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.

परंतु गोंधळाने व खडांजगीने गाजला.त्याबाबत भाजपाचे जिल्हा चिटणीस राजु माळी, यांनी मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणूक २०१७-१८ मध्ये प्रभागनिहाय मतदार यादी तयार करतांना सर्व ६ प्रभागात सम प्रमाणात मतदार संख्या ठेवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन राजु माळी यांनी दिले.

यावेळी राम पुनासे, राजेंद्र हिवराळे, भारिपचे तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, आत्माराम जाधव, शिवसेनेचे गणेश टोंगे,भाजपाचे शकील, पुप्पु बोराखेडे ,बंटी जैन, यांच्यासह ५० ते ६० नागरिकांनी आक्षेप घेतला व थेट तहसिलदार रचना पवार यांचे कार्यालय गाठले त्यानंतर सायंकाळी आरक्षण जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

*