सासरच्या नऊ जणांना एका वर्षाची शिक्षा

0
जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील शाहूनगरमधील विवाहीतेचा माहेरून दोन लाख रुपये यासाठी सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला होता. तसेच विवाहितेचा गर्भपात देखील केला होता.

प्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात जिल्हा न्यायालयाने पतीसह सासरच्या ९ मंडळींना दोषी ठरवून प्रत्येकी १ वर्षाची शिक्षा व दोन हजार दंड ठोठावला आहे.

शाहुनगरातील इम्रान बागवान यांचा बुशराबी बागवान यांच्याशी सन २०११ मध्ये विवाह झाला होता. इम्रान याचा स्पेअरपार्ट विक्रीचा व्यवसाय होता. दरम्यान इम्रानसह त्याच्या कुटुंबियींना बुशराबी हिला माहेरुन दोन लाख आणावे असा तगादा लावून तिचा छळ केला होता.

यावेळी बुशराबी हया माहेरून निघून गेल्या. त्यांच्या तक्रारीवरून पती इम्रान यांच्यासह सासरच्या मंडळीविरुध्द छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाप्रकरणी जिल्हा न्यायालयात कामकाज होवून न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयाने पती इम्रान बागवान , सासु फेहमेदाबी बागवान, सासरे हाजी अकबर बागवान, जेठ सलीम खान, मध्यस्थी याकुब दाऊदखान, जेठ मुस्तफा बागवान, जेठाणी शमीना बागवान, शाईनबी बागवान, नणंद नुरजहॉं जुनेद बागवान, अंजुम मोहम्मद बागवान या १० संशयितांविरुधध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हाप्रकरणी न्यायालयाने ११ संशयितांची साक्ष ग्राह्य धरून तसेच प्राप्त तक्रारीला अनुसरून संशयितांना दोषी ठरवून मध्यथी याकुब खान वगळता ९ जणांना १ वर्षाची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.

तसेच शिक्षेतील वीस हजार रुपयांच्या दंडाची रक्कमेतून १५ हजार रुपये पिडीत विवाहितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारपक्षातर्फे ऍड. आशा शर्मा यांनी कामकाज पहिले.

LEAVE A REPLY

*