कळमसरे शिक्षक बदली प्रकरणी उपोषणाला तात्पुरती स्थगिती

0
कळमसरे, ता.अमळनेर | वार्ताहर :  कळमसरे शिक्षक बदली प्रकरणी कळमसरे विद्या प्रसारक संस्थेने विद्यार्थ्यांच्या मागणीचे सहानूभूतीपूर्वक विचार व एस.एङ्ग.पावरा या शिक्षकाची बदली रद्द करावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

दि.२७ जून रोजी विद्यार्थ्ीर्यांनी विद्यालयाच्या गेटसमोर उपोषण केले होते. त्यात सात विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडली. त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर त्यामधील हर्षदा रणछोड पाटील हिची प्रकृती जास्त खालावल्याने तिला जळगाव येथे हलविण्यात आले होते.

विद्यार्थी पोट तिडकीने घोषणा देत होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये म्हणून पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगीत केले आहे. पालक व विद्यार्थी पावरा सरांची बदली रद्द करावी या मागणीवर ठाम आहेत.

दि.२८ जून रोजी इ. ५ वीत े ७ वी च्या वर्गातील पटावरील विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थी शाळेत आले होते. ३० पालकांनी शाळेत दाखला मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत.

तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीचा सहानूभुतीपूर्वक विचार करावा व पावरा सरांची बदली रद्द करावी. विद्यार्थी शाळेत आले किंवा आले नाहीत तरी शिकविण्याचे काम सुरू राहिल व शिक्षकांचा पगार बंद होणार नाही असे पत्रक मुख्याध्यापकांनी गावात वाटले.

तरी संस्थेने असे आडमठे धोरणे ठेवू नये त्यांच्या पत्राला पालकांनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. या सर्वांत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये व विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीला न्याय मिळावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*