अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानियाचा दीड लाखाचा पोशाख !

0
वॉशिंग्टन | वृत्तसंस्था : पूर्वाश्रमीच्या एक मॉडेल असलेल्या अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प अद्यापही त्यांच्या पोशाखांसाठी ओळखल्या जातात.

कोणत्याही कार्यक्रमात मीडियाचे त्यांच्या पोशाखाकडेही लक्ष असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली.

व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी केलं. त्यावेळी मेलानिया यांनी दीड लाख रुपये किमतीचा पिवळा पोशाख परिधान केला होता!

ट्रम्प-मोदी यांच्या भेटीनंतर मेलानिया अर्थातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या होत्या व त्याचे कारण होते त्यांचा हा सुंदर पोशाख. मेलानिया यांनी पिवळ्या रंगाचा बेल्टेड फ्लोरल प्रिंट गाऊन घातला होता.

दीड लाखाच्या या ड्रेसमुळे ट्विटरवर त्यांच्याबाबत मोठी चर्चा होती. राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीवेळी मात्र त्यांची मोठीच अडचण झाली होती. याचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे मेलानियासाठी अनेक फॅशन डिझायनर्सने ड्रेस डिझाईन करण्यास नकार दिला होता!

LEAVE A REPLY

*