झोप मोजण्याची स्मार्ट ‘वॉच’

0
हृदयाच्या ठोक्यांसह मधूमेह मोजण्याची स्मार्ट वॉच अलिकडेच बाजारात आली आहे. यातच आता बिंगो टेक्नॉलॉजी या कंपनीने टी-३० ही स्मार्ट वॉच बाजारात दाखल केली आहे.

या स्मार्ट वॉचमध्ये ऍन्ड्रॉईड मोबाईल फोन इतपत फिचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये झोप मोजण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.

बिंगो टेक्नॉलॉजी या कंपनीने टी-३० या स्मार्टवॉच ही तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ब्लॅक, सिल्व्हर आणि रोझ गोल्ड यांचा समावेश आहे.

स्मार्टवॉचमध्ये २ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेरा आहे. तसेच ३८० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी क्षमता सुमारे तीन तास असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

तसेच १.५६ इंच आकारमानाचा आणि २४० बाय २४० पिक्सल्स क्षमतेचा एलसीडी स्क्रिन आहे. तीच्या सुरक्षतेसाठी मोबाईल प्रमाणे नॅनो टफएंड ग्लासचे आवरण बसविण्याची सुविधा आहे. मॉडेलची रॅम १२८ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी आहे. ती मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १६ जीबीपर्यंत वाढविता येवू शकते.

मोबाईल प्रमाणेच सिमकार्ड येवू शकते व ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असल्याने फिचर्सची आदानप्रदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातुनच एकाद्या कॉल लावण्यासह एसएमएस सुद्धा पाठवता येवू शकता.

यातूनच स्मार्टफोनमधील एमपी-३ व एमपी-४ गाणी सुद्धा स्मार्ट वॉचमध्ये ऐकता येतात. झोप मोजण्याचे फिचर्स तसेच चालण्याचे अंतर मोजण्यासाठी पेडोमीटर, हवामानाची माहितीसाठी वेदर अलर्ट, वर्ल्ड क्लॉक, कॅल्युलेटर आदी फिचर्स आहेत.

LEAVE A REPLY

*