चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची सप्टेंबर महिन्यात निवडणूक

0
चाळीसगाव, |  प्रतिनिधी :  चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची लांबलेली निवडणुक नव्याने दुरुस्त करुन, सन २०१७ च्या घटने प्रमाणे, येत्या तीन महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याचा ठरवा सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधरण सभेत घेण्यात आला.

सभेत निवडणुक घेण्यावरुन सचालक मंडळ व सभासदांमध्ये बराच गदारोळ झाला. परंतू शेवटी न्यायलयाच्या निर्देशानुसार एकमताने तीन महिन्यात निवडणुक घेण्याचा निर्णय झाला.

घटना दुरुस्ती करुन, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तीन महिन्यात निवडणुक घेण्यासाठी चाळीसगाव एज्युकेशनची सर्वसाधरण सभा घेण्यात आली होती.

सभेच्या अध्यक्षस्थानी संजय रतन सिंग पाटील हे होत, तर व्यासपीठावर चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल, सचिव वसंत चंद्रात्रे, मो.रा.अमृतकार, डॅा.ए.बी.पाटील, ज.मो.अग्रवाल, प्रा.साहेबराव घोडे, सुरेश चौधरी, प्रेमचंद खिवसरा, गोपाल दायमा, नितिन पाटील, मिलिंद बिल्दीकरज, चंद्रकात पाखले, मगेश पाटील आदि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच सन २०१७ घटना दुरुस्ती करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवरुन वाद सुरु झाला. यावेळी सभासद किसनराव जोर्वेकर यांनी घटना दुरुस्ती समितीवर प्रश्‍न उपस्थित केलेत.

घटना दुरुस्ती समितीत पाच लोकांची नेमणूक करण्यात आली होती. यात संजय रतनसिंगप पाटील, मिलिंद बिल्दीकर, गोपाल दायमा, चंद्रकांत पाखले व प्रा.साहेबराव घोडे ह्या संचालक मंडळातीलच लोकांचा समावेश असल्यामुळे संचालक मंडळला किसनराव जोर्वेकर, कैलास पाटील, प्रा.किरण पाटील, अशोक खलाणे, सुरेश स्वार आदिनी चांगलेच धारेवर धरले.

समितीत सभासद व इतर लोकांचा का समावेश केला नाही असे प्रश्‍न उपस्थित केले असता, सचिव वसंत चंद्रात्रे यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच घटना दुरुस्तीचा अधिकार नसतानाही तुम्ही कशी काय घटना दुरुस्ती करु शकतात अशा प्रकराचे प्रश्‍नाचा भडिमार केला. यावर मॅनेजिंग बोर्डाच्या अनुभवारुन घटना दुरुस्ती केल्याचे उत्तर वसंत चंद्रात्रे यांनी दिले.

१०० व २०० वरुन वाद

घटना दुरुस्त करताना सर्वसाधरण सभा बोलविण्याचा अधिकाराचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा १०० सभासद संख्या ठेवायाची की २०० ठेवायाची यावरुन चांगलाच वाद झाला. शेवटी गोंधळातच २०० सभासद संख्या मजुंर करण्यात आली.

२०१७ च्या घटना दुरुस्तीच अनेक ठिकाणी बदल

सन २०१७ च्या घटना दुरुस्तीत अनेक ठिकाणी बदल करण्यात आले. यात अध्यक्षाना कुठल्याही विभागाची माहिती घेता येईल, संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याबरोबर निवडणुक घेण्यात येतील, आता संस्थेचा सभासद हा फक्त जळगांव जिल्हा कार्यक्षेत्रापुरता मर्यांदीत राहिल, तीन सर्वसाधरण सभेना सतत गैरहजर राहणार्‍या सभासदाचे सभासत्व रद्द करण्यात येईल. जनरल मधून १५ सभासद, तर कर्मचार्‍याचा मधून १ सभादत निवडणुक लढऊन शकतो आदि दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

अध्यक्ष म्हणाले आम्हाला मोकळे करा

चाळीसगाव एज्युकेशन सो. निवडणुकसाठी घेण्यात आलेल्या सर्वसाधरण सभेचे अध्यक्ष संजय रतनसिंग यांनी यावेळी उपस्थित प्रश्‍नांचा भडीमार करणार्‍या सभासदाना आव्हान केली की, चाळीसगाव एज्युकेशनची निवडणुक घेण्यासाठी आम्हाला मदत करा. एकदाची निवडणुक होऊ जाऊ द्या आणि आम्हाला मोकळे करा.

तीन महिन्यात निवडणुक झाली नाही तर राजीनामे

सन २०१७ ची घटना दुरुस्ती येत्या २५ ते २७ जुर्ले पर्यंत आम्ही करणार आहे. घटनेला मजुंरी घेऊन, येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत निवडणुक घेऊ, नाही तर आम्ही सर्व संचालक राजीनामे देणार असल्याचे यावेळी सभेचे अध्यक्ष संजय रतनसिंग यांनी भर सभेत सांगीतले.

तसेच सन २०१७ ची घटना धर्मआयुक्त यांनी नामजुंर केली, तर सन १९९२ च्या घटनेप्रमाणे निवडणुक घेण्यात येणार असल्याचेही यावेळी चेअमरन नारायण अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

वयाचा मुद्दयाला दिला बगल

चाळीसगाव एज्युकेशनच्या निवडणुकीसाठी वयोमार्याद ठेवावी असा प्रश्‍न यावेळी सभासद अनिल जाधव(हरी नाना) यांनी उपस्थित केला असता. या प्रश्‍नावर संचालक मंडळ व सभासदामध्ये फक्त हशा पिकला, आणि वयाच मुद्दा फारसा विचारात न घेता, त्या संचालक मंडळ व सभासदानीही बगल दिला.

वास्तविक पाहता, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीकोनातून हा सर्वात महत्वाच प्रश्‍न होतो. परंतू त्यांचे कोणी फारसे गांभीर्य घेतले नाही.

LEAVE A REPLY

*