बेलगंगा सुरु होण्याच्या मार्गावर : ऊस तोडणी ठेकेदारांना दिड कोटींचे धनादेश वाटप

0
चाळीसगाव । प्रतिनिधी :  अंबाजी ग्रृपने विकत घेतलेला बेलगंगा सारख कारखान्याची चाके फिरण्यासाठी दुरुस्तीच्या आतापर्यंत सर्व ट्रायल यशस्वी रित्या पार पाडल्या आहेत. येत्या ऑक्टोबर मध्ये कारखाना सुरु होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शुक्रवारी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांना येत्या गळीत हंगामासाठी आगाऊ रक्कमेचे दिड कोटीचे धनादेश अंबाजी गृ्रपच्यावतीने वाटप करण्यात आले. तसेच येत्या महिन्यात भरात चार कोटीचे धनादेश टप्प्या टप्प्याने वाटप करण्यात येणार असून एकूण आठ कोटी रुपयांचे वाटप करण्याचे अंबाजीचे नियोजन आहे.

बेलगंगा कारखाना स्थळी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदाराान धनादेश वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम दि.13 रोजी दुपारी दोन वाजता पार पडला.

यावेळी अंबाजीचे चेअरमन चित्रसेन पाटील, उद्योजक प्रवीणभाई पटेल, उद्धवराव महाजन, दिलीप चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, माजी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र केदारसींग पाटील, किरण देशमुख, अजय शुक्ल, शरद मोराणकार, निशांत मोमाया, अशोक ब्राह्मणकार, विजय अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष विनायक वाघ, निलेश निकम, एकनाथ चौधरी, डॉ.अभिजीत पाटील, राजू धामणे, दिनेशभाई पटेल, श्रीरामजी गुप्ता, माणकचंद लोढा, विकि पटेल, निलेश वाणी, डॉ.मुकुंद करंबळेकर, अर्जुन शिंदे, अशोक मेमाणे, बी.आर.पाटील, एस.के.भाकरे, शेतकरी व अधिकारी उपस्थित होते. कारखाना परीरसरात एक्साईज इन्स्पेक्टर व्ही.एम.माळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच कार्यालयातील संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

शेवटचा व महत्वाचा तिसरा   टप्पा आज पूर्ण- चित्रसेन पाटील

चेअरमन चित्रसेन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कारखाना चालविताना उसाची दररोज तीन हजार टन उसाची आवश्यकता भासणार आहे. ती पुरविण्यात मुख्य भूमिका असणार्‍या ऊस तोडणी व वाहतूकदार घटकांची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यांना धनादेश दिल्याने ऊस पुरवठा वेळेत होईल त्यामुळे कारखाना दिवाळीच्या आसपास सुरू होणार आहे. आजवर कारखाना सुरू होण्याअगोदर पैसे जमा करण्याचा पहिला टप्पा, कारखाना देखभाल दुरुस्ती करणे हा दुसरा टप्पा सुखरूप पार पडला आहे.

कारखान्याकरीता ऊस उपलब्ध करून देणार्‍या ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार यांचा शेवटचा व महत्वाचा तिसरा टप्पा आज पूर्ण होत आहे. त्यामुळे आज दीडशे पेक्षा अधिक ऊस तोडणी व वाहतूकदारांना चार कोटी रुपयांचा आगाऊ धनादेश देऊन त्यांची पुढील हंगामाकरीता बांधणी केली आहे. तसेच आजपर्यंत काखान्याचे आद्य संस्थापक स्वर्गिय रामराव जिभाऊंच्या आशीर्वादाने सर्व प्रक्रिया पार पडली. कारखाना सुरू करणे या मोहीमेचा पहिला टप्पा होता पैसे उभारणे ! मशिनरी दुरुस्ती, नवीन साहित्य, वेतन आणि अनेक बाबींसाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद करण्याचे काम अंबाजी परिवाराने जिवा पेक्षा जास्त ताकद लावून केले आहे

. केवळ पैशाने काम होत नाही. त्याचे चीज केले आम्ही ज्यांच्या हातात कारखानाची चक्रे सुरू व्हावीत म्हणून जबाबदारी सोपविली त्या कर्तबगार विभाग प्रमुखांनी केली आहे. एम.डी.नामदेव आप्पा, चीफ इंजिनियर शिंदे साहेब व चीफ केमीस्ट मेमाणी साहेब यांच्यासह इतर कामगारांनी प्राण ओतून काम केले व कारखान्याच्या सर्व ट्रायल यशस्वी रित्या पार पाडल्या. त्यामुळे कारखाना आत शंभर टक्के सुरु होणार असल्याचा विश्वास श्री पाटील यांनी दाखविला आहे.

LEAVE A REPLY

*