जळगाव जिल्ह्यात युरियाचा तुटवडा : डीएपीची मात्रा देण्याचे कृषी विभागाचे आवाहन

0
जळगाव ।  प्रतिनिधी :  जिल्ह्यात काही प्रमाणात का होईना पिकांसाठी पोषक पाऊस झाला आहे. त्यामुळे 94 टक्केपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. पावसाचा शिडकाव सुरु असल्याने पिके जोमाने वाढत असल्याने खत पुरवठा करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु आहे. मात्र सद्यस्थितीत बाजारात युरियाचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जवळपास 1 लाख 14 हजार 400 मेट्रीक टन युरियाचे आवंठण मंजुर केले आहे. त्यापैकी आता पर्यंत 47 टक्के आवंठण प्राप्त झाले आहे. पेरणीनंतर खतांची आवश्यकता असतांना तो मुबलक प्रमाणात असला तरीे युरीयाचासाठा मुबलक नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. जोपर्यंत दमदार पाऊस पडत नव्हता तोपर्यंत युरियासह अन्य मिश्र खतांना मागणी नव्हती. परंतु गेल्या आठ दिवसात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांकडून खतांची मागणी वाढली आहे.

पंधरा दिवसात उपलब्ध होणार  52 हजार टन साठा

कृषी विभागाकडून या वर्षी 1 लाख 14 हंजार 400 टन युरीयाची मागणी नोंदविण्यात आली आहे. जुलै अखेर 79 हजार 200 टन युरीया उपलब्ध होणार असला तरी आता पर्यंत 37 हजार 234 टन युरीयासाठा उपलब्ध झाला आहे. येत्या दोन आठवड्यात 52 हंजार टन पर्यंत युरीया उपलब्ध होणार आहे.

युरियाचा अतिवापर कपाशीला हानीकारक

युरिया हे इतर खतांपेक्षा स्वस्त असल्याने पेरणीनंतर पिक वाढीसाठी शेतकर्‍यांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. युरीयाची थेैली 295 रूपयात उपलब्ध होते.तर डीएपी खताची थैली 1100 रूपयात येत असल्याने शेतकर्‍यांकडून पर्यायाने हे खत वापरले जात आहे.

त्यामुळेच युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र युरियाचा अतिवापर केल्यास अळीचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो. त्यामुळे युरियाऐवजी डीएपी खतांची मात्र देणे आवश्यक आहे. डिएपीमुळे पिकांची वाढ, फलधारणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सोयाबीनची दुबार पेरणी

जिल्ह्यात पावसाने हंजेरी लावल्याने पेरणी 94 टक्के झाली असली तरी सोयाबीनच्या पेर्‍याला मोड आल्याने साधारणत: 2 हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे.जळगाव, यावल, रावेर या तालुक्यात सोयाबीनचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.

LEAVE A REPLY

*