चुंचाळे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

0
चोपडा ।  प्रतिनिधी :  तालुक्यातील चुंचाळे येथील विजय उर्फ संजय रवींद्र कोळी (वय 21) या युवकाने शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दि.13 रोजी दुपारी 2.30 वाजता चुंचाळे येथील विजय उर्फ संजय रवींद्र कोळी (वय-21) या युवकाने घरी कोणी नसतांना घरातील लाकडी सर्‍याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यास दुपारी 4 वाजता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.गुरुप्रसाद वाघ यांनी मृत घोषित केले.

याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुप्रसाद वाघ यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मंगलेश शिंदे हे करीत आहेत.

युवकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने माझ्या मर्जीने आत्महत्या करीत असून कोणास दोषी धरू नये तसेच मला जगावेसे वाटत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे. यावरून त्याने वैफल्यग्रस्त मनस्थितीत आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

युवकाचे आईवडील शेतात कामाला गेले होते. त्याचे आयटीआय पर्यंतचे शिक्षण झाले होते. पश्चात भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*