मनोज लोहार यांचे निलंबन रद्द

0
जळगाव ।  प्रतिनिधी :  पोलिस दलात नेहमी वादग्रस्त असलेले नाशिक येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे तत्कालीन पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा शासकीय सेवेत पुनस्थापित करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

नाशिक येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठीचा अहवाल पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आला होता़ त्या अहवालाची दखल घेत महासंचालकांनी मनोज लोहार यांच्या निलंबनाची कारवाई केली होती़ या संदर्भात लोहार यांनी सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे अपील केली होती़

त्या अपीलावर सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली़ त्यानंतर लोहार यांचे निलंबन रद्द करण्याकरीता व त्यांना सेवेत पुनस्थापीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री यांनी 14 जून रोजी दिला होता़

त्यानुसार शासनाने लोहार यांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत पुन:स्थापीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*