Breaking # Video # पारोळयाजवळील तुराटखेडा गावाजवळ शिवशाही व लक्झरीची धडक : एक ठार

0

पारोळा । प्रतिनिधी :  पहाटे सहा वाजता पारोळा तालुक्यातील तुराटखेडा गावानजीक पारोळ्याकडून जळगाव कडे जाणारी महामंडळाची शिवशाही बस व अकोल्याहून सुरत लग्नासाठी जाणाऱ्या लक्झरी बस यांच्यात सामोरा समोर धडक होऊन दोघ वाहनातील सुमारे ३५ ते ४० जण जखमी झाले असून योगेश कांतीलाल शाह वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला.

१५ जखमी पारोळा येथे तर बाकी जखमींना १०८,व खाजगी रुग्णवाहिकेतुन एरंडोल येथे हलविण्यात आले असून शाह परिवाराच्या नातेवाईकांनी कुटीर रुग्णालयात गर्दी केली होती.

पारोळा कुटीरला वैद्यकीय अधिकारी नसल्याने १०८ चे डाँक्टर व खाजगी डाँक्टरांनी उपचार केले हे विशेष

LEAVE A REPLY

*