जळगाव मनपा निवडणुकीत 189 अर्ज बाद : शिवसेनेच्या चार उमेदवारांवर अपक्ष लढण्याची नामुष्की

0
जळगाव ।  प्रतिनिधी :  महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 615 उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननीअंती 427 वैध ठरले असून 189 अर्ज अवैध ठरले. दरम्यान शिवसेनेतर्फे 75 उमेदवारांचे एबी फॉर्म दिले होते. मात्र चार उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द बाद झाले. त्यामुळे शिवसेनेतर्फे 71 उमेदवार तर चार उमेदवार अपक्ष रिंगणात असणार आहेत.

मनपा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी-सपा आघाडी, हिंदु महासभा, बसपा, कम्युनिस्ट, बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी, एमआयएम, अपक्ष असे एकुण 615 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दाखल झालेल्या अर्जांची प्रभागनिहाय उमेदवारांसमक्ष छाननी करण्यात आली असून 427 अर्ज वैध तर 189 अर्ज अवैध ठरले आहे.

एमआयएम रिंगणात

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच एमआयएम पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. छाननीअंती 6 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

शिवसेनेचे 71 उमेदवार

शिवसेनेने 75 उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. परंतु गणेश (विक्रम) सोनवणे, जिजाबाई भापसे, लिना पवार आणि हेमलता वाणी यांचे एबी फॉर्म बाद झाले. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवावी लागणार असून शिवसेनेच्या 71 उमेदवारांचे एबी फॉर्म वैध ठरले आहे.

निवडणुक खर्च सादरीकरणाबाबत आज प्रशिक्षण

उमेदवारांना दैनंदिन निवडणुक खर्च ऑनलाईन सादर करावा लागणार आहे. परंतु ‘ट्र वोटर’ या अ‍ॅपद्वारे खर्च सादरीकरण करतांना उमेदवारांना अडचणी येवू लागल्या आहे. त्यामुळे निवडणुक खर्च सादर करण्याबाबत उद्या दि.14 रोजी सकाळी 11 वाजता दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले.

माघारीकडे लक्ष

मनपा निवडणुकीसाठी 427 अर्ज वैध ठरले असून माघारीची मुदत दि.17 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या माघारीकडे लक्ष लागले असून तीन ते चार जागा बिनविरोध होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

पक्षनिहाय वैध  उमेदवारी अर्ज

शिवसेना      71

भाजप         75

राष्ट्रवादी       44
काँग्रेस        17
सपा           06
अपक्ष        201
एमआयएम   06
कम्युनिस्ट     01
बसपा         01
हिंदु महासभा  03
बीआरएसपी   02

एकूण         427

LEAVE A REPLY

*