स्मार्ट ग्राम चितेगावच्या सरपंचांचा होणार गौरव

0
चाळीसगाव, |  प्रतिनिधी :  तालुक्यातील चितेगांवचे सरपंच अमोल भोसले यांनी गावात विविध योजना राबऊन उत्कृष्ट काम केल्याबद्दल मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथे दिनांक २७ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज होऊ घातलेल्या कार्यशाळेत त्यांचा गौरव होणार आहे.

भोपाल येथील कार्यशाळेसाठी सन्मानित होणारे ते एकमेव सरपंच असल्यामुळे, हि बाबा तालुक्यासाठी भूषावह आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पंचायत राज मंत्र्यांची कार्यशाळा मंगळवार, दि.२७ जून रोजी होत आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातून एकमेव चितेगाव (ता.चाळीसगाव) ग्रामपंचायतीचा विशेष गौरव केला जाणार आहे.

चितेगाव ही जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ मानांकन प्राप्त ठरलेली ग्रामपंचायत असून स्मार्ट ग्राम म्हणून शासनाने या ग्रामपंचायतीचा गौरव केला आहे. कार्यशाळेत महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांचे पंचायत राजमंत्री व त्यांचे सचिव तसेच या राज्यांमधील स्मार्ट ग्राम पुरस्कार ग्रामपंचायतींचे सरपंच सहभागी होतील.

नासिक विभागातून राजदेरवाडी (ता.चांदवड, जि.नासिक), मलांजन (ता.साक्री.जि.धुळे), लोणी (ता.राहता जि.अहमदनगर) तसेच जळगाव जिल्ह्यातून चितेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा गौरव होणार आहे.

तालुक्यातील चितेगांवचे सरपंच अमोल भोसले यांनी गावातील समस्या कशा सुटतील यावर नेहमी भर दिला आहे. ग्राम स्वच्छता, १०० % हगणदारी मुक्त गाव, संगणकीकृत ग्रामपंचायत आणि प्रशस्त इमारत, गावाला भासत असलेल्या पाणी टंचाई निवारणार्थ रेनवॉटर हॉर्वेस्टींग, गाव सतत प्रकाशमय असावे यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी दिवे, कॉंक्रिटीकरण रस्त अशी विविध विकास कामे त्यांनी गावात केली आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ मानांकन प्राप्त ठरलेली ग्रामपंचायत तसेच स्मार्ट ग्राम चितेगांव ठरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनी (१ मे) स्मार्ट ग्राम म्हणून चितेगाव ग्रामपंचायतीचा प्रशस्तीपत्र व १० लक्ष रुपयांचा धनादेश देऊन राज्याचे कृषी व पणन मंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

ग्रामपंचायतीचा विकास साधण्यासठी सरपंच अमोल भोसले यांना उपसरपंच किरण जाधव, ग्रामसेविका सविता पांडे आणि सर्व ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ यांची मोलाची साथ लाभली आहे.

LEAVE A REPLY

*