पावसामुळे रेल्वे प्रवासी गाड्यांच्या मार्गात बदल : भुसावळ-जळगाव दरम्यान वाहतूक खोळंबली

0
भुसावळ ।  प्रतिनिधी :   दोन दिवसांपासून मुंबईसह उपनागरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यानच्या रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ती सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल 20 गाड्यांच्या मार्गात बदल करुन त्या गाड्या भुसावळ विभागातून सुरत व खंडवामार्गे रवाना केल्याने सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान जळगाव ते भुसावळदरम्यान एका पाठोपाठ एक अशा 11 गाड्या मार्गावर थांबून होत्या तर या वळविलेल्या गाड्यांमुळे भुसावळ स्थानकाच्या परिचालन यंत्रणेवर मोठा ताण आल्याने काही काळ वाहतूक खोळंबलेली होती.

बदल करण्यात आलेल्या या 20 गाड्यांपैकी काही गाड्या पनवेल, कल्याण, ईगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा,भोपाळ,उज्जैन रतलाम, दौंड, वाडी अशा वेगवेगळ्या मार्गे त्यांच्या गंतव्यस्थानी रवाना करण्यात आल्या.

मार्गात बदल केलेल्या गाड्या अशा

19567 तुतीकोरिन -ओखा विवेक एक्स,

18405 यशवंतपुर -ब़ाडमेर एक्सप्रेस,

12263 पुणे निजामुद्दीन एक्सप्रेस,

19667 उदयपुर म्हैसुर एक्सप्रेस,

12217 कोचुवेली-चंदीगड एक्सप्रेस,

11026/11025 भुसावळ -पुणे -भुसावळ एक्सप्रेस,

22943 पुणे- इंदौर एक्सप्रेस,

19202 पोरबंदर-सिकंदराबाद एक्सप्रेस,

19577 तिरुनेलवेल्ली- जामनगर एक्सप्रेस,

12449 मडगाव- चंदीगड गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेस,

16508 केएसआर बंगळुरु जोधपूर एक्सप्रेस,

22654 निजामुद्दीन -तिरुवनंतापुरम (त्रिवेंद्रम) सुपर फास्ट एक्सप्रेस,

22660 डेहराडून-तिरुवनंतापुरम (त्रिवेंद्रम) एक्सप्रेस,

16505 गांधीधाम – केएसआर बंगळुरु एक्सप्रेस,

11089 भगत की कोठी -पुणे एक्सप्रेस,

16334 तिरुवनंतापुरम (त्रिवेंद्रम)-वेरावळ एक्सप्रेस,

22497 श्रीगंगानगर-तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस,

12940 जयपूर-पुणे एक्सप्रेस,

17018 सिकंदारबाद -राजकोट एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

वळविण्यात आलेल्या गाड्या भुसावळ स्थानकावरील सर्वच फालाटांवर थांबविण्यात आल्याने डाऊन मार्गावरील गाड्यांना बराच खोळंबा झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वे प्रशासाने वाहतुक सुरळीत करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले. प्रवाशांच्या सुविधेसाठी गाड्यांबद्दल दिशा व मार्गदर्शन करणार्‍या उद्घोषणा वारंवार करण्यात येत असल्यामुळे प्रवाशंना इप्सित गाड्यांची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

*