अबब…..पंतप्रधान मोंदीच्या 4 वर्षातील विदेशवारीचा खर्च 355 कोटी, 30 लाख, 38 हजार 465 रूपये फक्त

0
नवी दिल्ली : 4 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 41 विदेश दौरे काढून 52 देशांना भेटी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी. अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसने गिनीज बुककडे एका पत्रााव्दारे केली आहे.

काँग्रेसच्या बंगरुळच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरटीआय अंतर्गत ही माहिती मागविली होती. त्या माहितीच्या आधारावर गोवा काँग्रेसने गिनीज बुककडे ही मागणी केली आहे.

श्री. मोदी यांनी 4 वर्षात 41 विदेश वार्‍या करत 52 देशांना भेटी दिल्यात. त्यासाठी 355 कोटी, 30 लाख, 38 हजार 465 रूपये खर्च झाले आहेत.

LEAVE A REPLY

*